कल्याण-शीळ रस्ते प्रकल्प बाधितांचे बेमुदत उपोषण सुरु

By मुरलीधर भवार | Published: September 20, 2022 05:02 PM2022-09-20T17:02:35+5:302022-09-20T17:04:38+5:30

मोबदला मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

hunger strike of Kalyan Sheel road project affected people | कल्याण-शीळ रस्ते प्रकल्प बाधितांचे बेमुदत उपोषण सुरु

कल्याण-शीळ रस्ते प्रकल्प बाधितांचे बेमुदत उपोषण सुरु

Next

कल्याण-कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सीमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. या रस्ते प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मोबदला मिळालेला नाही. मोबदला लवकर देण्यात यावा यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने आजपासून काटई नाक्याजवळ बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या बेमुदत उपोषणात गजानन पाटील, गणेश म्हात्रे, कर्सन पाटील, महादेव ठाकूर, सुभाष पाटील आदी प्रकल्प बाधित शेतकरी सहभागी झाले आहे. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटकरणाचे काम सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरु आहे. काम आत्तार्पयत ७० टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे. मात्र कल्याण ते शीळ दरम्यान शेतक:यांची जमीन प्रकल्पात बाधीत झालेली आहे. या शेतक:यांना सरकारकडून अद्याप मोबदला मिळालेला नाही. यापूर्वी रस्तयाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. तेव्हा देखील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यासाठी समिती गठीत केली होती. या समिताचा अहवाल चार वर्षे उलटून गेली तरी अद्याप सादर करण्यात आलेले नाही. त्यानंतर पुन्हा नव्याने समिती गठीत केली गेली. त्याचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी होते.

त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयात खासदारांच्या उपस्थित बैठक झाली होती. त्यावेळी भूसंपादनाची संयुक्त मोजणी करण्याचे ठरले होते. ७ ते ८ हेक्टर जमीनाचा मोबदला अद्याप बाधीतांना मिळालेला नाही. थेट वाटाघाटीने हा मोबदला देण्याचे ठरले होते. समृद्धी महामार्गाच्या धरतीवर रेडीरेकनरनुसार चार पटीने जास्त मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. जवळपास २०० बाधित शेतकऱ्यांना किमान १५० कोटी रुपयांचा मोबदला मिळणे अपेक्षित असल्याचे उपोषण कत्र्याकडून सांगण्यात आले.

Web Title: hunger strike of Kalyan Sheel road project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण