कल्याण लोकसभेचा खासदार मीच राहणार, मीच निवडणूक लढवणार!

By मुरलीधर भवार | Published: October 3, 2023 07:17 PM2023-10-03T19:17:10+5:302023-10-03T19:19:29+5:30

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विरोधकांना आव्हान

I will be the MP of Kalyan Lok Sabha, I will contest the election says Shrikant Shinde | कल्याण लोकसभेचा खासदार मीच राहणार, मीच निवडणूक लढवणार!

कल्याण लोकसभेचा खासदार मीच राहणार, मीच निवडणूक लढवणार!

googlenewsNext

मुरलीधर भवार-कल्याण: लोकसभा मतदार संघाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ्. श्रीकांत शिंदे यांनी, माझ्या लोकसभा मतदार संघाची काळजी करू नका, मी कल्याण लोकसभा मतदार संघातूनच निवडणूक लढणार आणि पुन्हा मताधिक्याने निवडून येणार असे आव्हान विरोधकांना दिले आहे.

खोणी आणि शिरढोण म्हाडा रहिवासी महासंघतर्फे म्हाडाची घरे मिळवून देण्यात खासदारदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार डोंबिवलीतील पाटीदार भवनात आज आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात खासदार शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उपरोक्त आव्हान विरोधकांना दिले आहे.

दिवा येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे लिहिलेला केक कापला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात मनसे पाटील हे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती . खासदार शिंदे यांनी मनसे आमदारांचा नामोल्लेख न करता सडकून टिका केली. खासदार शिंदे म्हणाले की, लोकाना टीका करण्याची सवय आहे ,पाच वर्षे लोकांनी त्यांना जबाबदारी दिली त्यांनी काही काम केले नाही.आता त्यांना स्वप्न पडायला लागली आहेत. ,मुंगेरी लाल के हसीन सपने. स्वप्न पाहणे वाईट नाही. मात्र आजीच्या पुढे माजी लागता कामा नये. लोकांचे प्रेम हे कामातून मिळते. ते कुठून विकत घेता येत नाही. तसेच ट्ववीटरवर लिहून मिळत नाही. चांगली कामे होत असलीत तर त्यामध्ये खो घालतात. पाच वर्षात त्यांनी आ’फिस देखील उघडले नाही. लोकांना माहितीच नाही कुठे जायचे. मी कामातून बाेलतो. वायफळ बडबड करीत नाही.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावा यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असल्याचे चर्चा होती .या विषयी खासदार शिंदे यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा असेल त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतो. याठिकाणी शिवसेना भाजपची युती आहे. युतीवर विश्वास ठेवणारा या ठिकाणचा मतदार आहे. शिवसेनेला आणिरभाजपला किती जागा मिळणार याबाबत दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय योग्य वेळी घेतील. तेव्हाच तुम्हाला योग्य प्रश्नाचे उत्तर मिळेल.

Web Title: I will be the MP of Kalyan Lok Sabha, I will contest the election says Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.