मी कोणत्याही कामात एक टक्का ही घेणार नाही - खासदार बाळ्या मामा
By मुरलीधर भवार | Published: June 14, 2024 05:41 PM2024-06-14T17:41:56+5:302024-06-14T17:42:37+5:30
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्यानंतर खासदार बाळ्या मामा यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
कल्याण - मी कोणत्याही कामात एक टक्का ही पैसे घेणार नाही. माझ्या कार्यकाळात कोणत्याही कामात निष्काळजीपणा झाला तर अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करणार असे वक्तव्य भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामना यांनी केले आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्यानंतर खासदार बाळ्या मामा यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग ढासळला. या किल्ल्याची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शिवसेना शिंंदे गटाचे पदाधिकारी यांनी पाहणी केली. शिवसेनेने किल्ल्याच्या दुरावस्थेचे खापर पुरातत्व विभागावर फोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी १२ काेटी ५० रुपये निधी मंजूर केला होता. मात्र काही काम झाले. काही काम निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यावर थांबविले गेले.
या घटनेनंतर महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे नवनिर्वात खासदार बाळ्यामामा यांच्यासह ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी केली. खासदार बाळ्या मामा यांनी थेट जिल्हाधिाकरी यांना फोन लावला. आचारसंहितेमध्ये अशी कामे थांबविता येत नाहीत ही कामे त्वरीत सुरु करावीत. अधिकाऱ्यांना आदेश द्यावा असं फाेनवरुन सांगितलं. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी फोनवरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला काम सुरु करण्याचे आदेश दिले. या कामाकरीता पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.