'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 03:37 PM2021-06-15T15:37:10+5:302021-06-15T15:37:33+5:30

Kalyan : मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

'If Di. Ba. Patil's name is rejected ... '; Bhumiputra warns state government | 'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

Next

कल्याणनवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना या मागणीचा विचार राज्य सरकारकडून केला जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भूमीपूत्रांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजप नेते जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो , रिपाईचे अकुंश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्याच्या मुद्यावर ठाम आहे. आत्तार्पयत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव दिले नाही. उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वादाचा फटका तत्कालीन सरकारला बसला होता. दि. बांचे नाव देण्याचा लढा हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढय़ाचे स्वरुप धारण करु शकतो. आत्ता संयमाने घेतले जात असले तरी पुढे संयम ठेवला जाईल अशी आपेक्षा सरकारने आमच्याकडून ठेवू नये असा सूर या बैठकीतून व्यक्त केला गेला.

खासदार पाटील यांनी सांगितले की, आपला समाज एखादा विषय पकडतो आणि सोडन देतो. या आंदोलनात जो सहभागी होईल तोच खरा भूमीपूत्र आहे. ही भूमिका प्रत्येक भूमीपूत्रपर्यंत पोचविल्यास आंदोलनास व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकते. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यावेळी आमचा त्याला विरोध नव्हता. पण दि. बांच्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही. सिडकोने पारित केलेल्या ठरावानंतर सिडको आली कूठून असा काही नेते मंडळी सवाल उपस्थित करीत असली तीर सिडकोला भूमीपूत्रांनी जागा दिली आहे म्हणून सिडको आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका मांडलेली नाही.त्यांची भूमिका स्पष्ट होताच त्याचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे आंदोलन व्यापक होईल.

Read in English

Web Title: 'If Di. Ba. Patil's name is rejected ... '; Bhumiputra warns state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.