कल्याण स्टेशन परिसरात फेरीवाले बसले तर केडीएमसी अधिकाऱ्यांना ठोकणार, राजू पाटलांचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: October 4, 2023 04:36 PM2023-10-04T16:36:09+5:302023-10-04T16:37:45+5:30
कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवा’कवर एका मराठी तरुणाला तुम्ही मराठी लोक असेच असता असे म्हणून परप्रांतिय फेरीवाल्यांनी मारहाण केली.
कल्याण - कल्याण स्टेशन परिसरात फेरीवाले बसले तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठोकून काढू असा सज्जड इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवा’कवर एका मराठी तरुणाला तुम्ही मराठी लोक असेच असता असे म्हणून परप्रांतिय फेरीवाल्यांनी मारहाण केली. या तरुणाच्या मदतीला मनसे कार्यकर्ते धावले. त्यांनी फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणात महात्मा फुले पोलिस ठाण्यात मराठी तरुणासह मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर फेरीवाल्याच्या विरोधात केवळ एनसी दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी आज मनसे आमदार पाटील यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांची भेट घेतली. पोलिसांनी असा कसा काय गुन्हा दाखल केला असा सवाल उपस्थित केला. या प्रसंगी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, चेतना रामचंद्रन, योगेश गव्हाने, विनोद केणे आदी उपस्थित होते.
स्टेशन परिसरात मुजार रिक्षावाले, वारांगणा, फेरीवाल्यांचे बस्तान असते. सामान्य नागरीकांना चालणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. त्यांच्याकडून हप्ते गोळा केले जातात. स्टेशन परिसरात फेरीवाले बसले तर महापालिकेच्या अधिकाऱ््यांना ठाेकून काढू असा इशारा दिला आहे. फेरीवाला हा प्रश्न महापालिकेशी संबंधित आहे. तसेच रेल्वेचा काही भाग हा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने या दोन्ही प्रशासनाला महात्मा फुले पोलिस ठाण्याकडून आजच पत्र दिले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेत कारवाई करण्यास सांगितले जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी आमदार पाटील यांना दिले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आणि स्टेशन परिसरात सीसीटीव्ही लावले आहे. त्याचा उपयोग काय होतो की नाही असा सवाल आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. केडीएमसीली भीक लागली असले तर आम्ही चार दिवस स्टेशनच्या बाहेर बसून भीक मागून. त्यातून आलेले पैसे केडीएमसीला देऊ असेही आमदार पाटील यांनी सांगितले.