"महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल"

By मुरलीधर भवार | Published: April 13, 2024 06:48 PM2024-04-13T18:48:22+5:302024-04-13T18:48:49+5:30

उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा दावा

"If opposition wins even one seat in Maharashtra, it will be a big success" | "महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल"

"महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल"

कल्याण-महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि परिवार वादी यांच्यात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात मोदी मॅजिक बोलत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वातावरण आहे की, जनता निवडणूका लढवित आहेत. राजकीय पक्ष निवडणूका लढवित नाहीत. निवडणूकीची दोरी जनतेच्या हाती आहे. या निवडणूकीत देशात पुन्हा मोदी लाट असेल. महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल असा दावा उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांनी आज येथे केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी सुपर वॉरियर्स मेळावा कल्याण पश्चिमतेली वायले नगरातील साई सभागृहात पार पडला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी शर्मा यांनी उपरोक्त दावा केला. शर्मा यांनी सांगितले की, विराेधक नकारात्मक मानसिकता आहे.विरोधी मोदी विरोधाच्या आधारे अपशब्द उच्चारले जातात. संजय राऊत हे मोदी आणि शहा यांना विनाशकारी म्हणतात. मी म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना समर्थन करणारे संजय राऊत बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. राम आणि आंबेडकरांचा विराेध करणाऱ्या काँग्रेसच्या सोबत आहेत. उद्धव यांची शिवसेनेने रामनामाचा नकली पोषाख परिधान केला आहे.

तुमची लढाई काेणासोबत आहे असा सवाल शर्म यांना विचारला असता त्यांनी सांगितेल की, भाजपची लढाई कोणाशी नाही. भाजपसमोर विरोधक विखुरलेले आहेत. मी समजतो की, एनसीपी शरद पवार यांची लढाई शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसला नष्ट करण्यासाठी पुढे आले आहेत. तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांना संपविण्याचे काम करीत आहे. विरोधकांकडे निती, नियत आणि नेतृत्व नाही. ४ जून नंतर सगळ्यात पहिले शिवसेना का’ंग्रेस वेगळी करेल. का’ग्रेसपासून राष्ट्रवादी वेगळी होईल. हे तिन्ही पक्ष परस्परांचे सगळ्यात कट्टर विरोधक असतील असा दावा शर्मा यांनी केला आहे.

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी स्वत: म्हटले आहे की, बाळासाहेबांचे सिद्धांत भाजपचे मोदी पूर्ण करीत आहेत. त्यामुळे मनसेने मन से समर्थन दिले आहे. त्यामुळे त्यांचे मी त्यांना मनसे धन्यवाद देतो असे शर्मा यांनी सांगितले.

Web Title: "If opposition wins even one seat in Maharashtra, it will be a big success"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.