पंकजा मुंडेंनी ‘निर्णय’ घेतला, तर पवारांच्या राष्ट्रवादीत स्वागत; महेश तपासे यांचे विधान

By मुरलीधर भवार | Published: September 27, 2023 03:13 PM2023-09-27T15:13:53+5:302023-09-27T15:14:48+5:30

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, असे सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत.

If Pankaja Munde is coming to NCP, he will welcome her, said Mahesh Tapase | पंकजा मुंडेंनी ‘निर्णय’ घेतला, तर पवारांच्या राष्ट्रवादीत स्वागत; महेश तपासे यांचे विधान

पंकजा मुंडेंनी ‘निर्णय’ घेतला, तर पवारांच्या राष्ट्रवादीत स्वागत; महेश तपासे यांचे विधान

googlenewsNext

कल्याण- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, असे सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने सातत्याने दुजाभाव केल्याचे चित्र आजपासून नाही तर २०१४ पासून आपण बघतो आहे. ज्या राज्यातल्या एका मोठ्या नेत्याच्या कन्या आहेत. बहुजन नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्राचे जनतेला आस्था आहे. भाजपात महिलांना काय स्थान दिले जाते ,किती प्रोत्साहन दिले. पंकजा मुंडे तर काही भूमिका घेत असेल तर त्याचा विचार भाजपणे केला पाहिजे पाहिजे. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येत असतील तर त्यांचे स्वागत करूअसे तपासे यांनी सांगितले.

महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना तपासे यांनी पंतप्रधानांनी विशेष लोकसभेचा अधिवेशन बोलवून महिला आरक्षण विधेयक मांडले. हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत देखील मंजूर झाले. २०२४ च्या लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण महिलांना मिळेल त्यांचे संख्या दोन्ही सभागृहांमध्ये वाढेल अशा अपेक्षा होती. परंतु महिला आरक्षण अस्तित्वात २०१९ ला येणार की २०३४ ला येणार याच्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. जर ते उशिरा होणार असेल तर तो एक प्रकारचा पॉलिटिकल जुमलाच झाला अशी टीका तपासे यांनी केली आहे.

कांद्याचा लिलाव गेल्या सात दिवसांपासून बंद आहे चर्चेची मागणी होते आहे. मात्र काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदार झाला याविषयी तपासे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के आयात कर लावून शेतकऱ्यांचा कांदा सडवण्याची भूमिका घेतली. कांद्याचे निर्यात झाली असती तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता कांद्याचे भक्षण झाले नसते शेतकरी विरोधी धोरण आहे. एकीकडे पंतप्रधान शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केल्याच बोलतात. मात्र प्रत्यक्षात निम्म्याहुनी कमी उत्पन्न झाले. ४० टक्के निर्यात कर लावल्यामुळे भारतीय कांद्याला परदेशात मागणी नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला अशी टीका तपासे यांनी केली आहे.

Web Title: If Pankaja Munde is coming to NCP, he will welcome her, said Mahesh Tapase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.