खड्डे योग्य प्रकारे भरले नाही तर कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार, आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:37 PM2021-10-04T14:37:41+5:302021-10-04T14:39:07+5:30
कल्याण-पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
कल्याण-पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. खड्डे तांत्रिकदृष्टय़ा योग्य प्रकारे भरले गेले नाहीत तर संबंधित कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जबाबदार अधिकारी अभियंते यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्याचा सज्जड इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
आज दुर्गाडी किल्ला परिसर, संदीप हॉटेल रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांच्यासह अभियंते सुभाष पाटील उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील डांबराचे तापणान तपासण्यात आले. तसेच काही सॅम्पल्स घेऊन तपासणी करण्यात आली.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी सांगितले की, महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्याचे काम करते. महिन्याभरात खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे शहर अभियंत्यांनी सांगितले आहे. महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम गतवर्षी केले होते. त्यापैकी 7क् रस्त्यावर खड्डे पडले नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. 7क् रस्ते सुस्थितीत असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. त्याची यादी ही त्यांनी सादर केली आहे. तांत्रिकदृष्टय़ा खड्डे योग्य प्रकारे भरले गेले पाहिजेत. डांबराचे तापमान चेक केला पाहिजे. खड्डा भरण्यापूर्वी तो हायड्रोलीक पद्धतीने ड्राय केला गेला पाहिजे. त्यानंतर त्यावर डांबरमिश्रित खडी टाकली गेली पाहिजे. ज्या कंत्रटदाराला खड्डे भरण्याचे काम दिले आहे. त्याच्याकडून तांत्रिकदृष्टया योग्य प्रकारे खड्डे भरण्याचे काम केले गेले नाही तर संबंधित कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच खड्डे भरण्याच्या कामाची जबाबदारी महापालिकेच्या ज्या अधिकारी आणि अभियंत्यावर दिलेली आहे. त्याच्याकडून योग्य प्रकारे देखरेख ठेवली गेली नाही. तर संबंधित अधिकारी आणि अभियंते यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
27 गावातील रस्त्यावरील खड्डे मागच्या वर्षी बुजविले नव्हते.
27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळयात आलेली होती. त्यामुळे त्या गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नव्हेत. या गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचे आयुक्तांनी मान्य करीत 27 गावातील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.