"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

By मुरलीधर भवार | Published: February 28, 2024 03:46 PM2024-02-28T15:46:05+5:302024-02-28T15:51:19+5:30

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

"If the party tells me, I will contest the election against the candidate.", Sushma Andhare | "पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

कल्याण - शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदार संघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली जाणा अशी चर्चा आहे. याविषयी शिवसेना नेत्या सुषणा अंधारे यांनी सांगितेल की, माझे नाव चर्चेत आहे. पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. पक्षाने मला सांगितले तर वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविणार, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

शिवसेना नेत्या अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा सुरु आहे. या निमित्त त्या कल्याणला आल्या होत्या. त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कोळसेवाडी शिवसेना शाखेतील पदाधिकाऱ््यांची भेटीगाठी घेतल्या. यावेळी अंधारे यांनी शाखेत पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी आव्हान पेलण्यास तयार आहे. पक्षाकडून होणार आला पाहिजे असेच सूचक विधान केले.

अंधारे म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असे वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी समोर सामोरे जाताना फार मोठा आव्हान आहे असे वाटत नाही. कल्याणमध्ये शिंदे गटाचा शहर प्रमुखावर भाजप आमदार अंधारात नाही तर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. हे दोघेही सरकार पक्षातले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वितुष्ट हे गॅंगवारचे स्वरूप घेत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिलेत याबाबत बोलताना सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही. मात्र, त्यासोबतच मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे तीन-चारशे लोक मेलेत त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर एसआयटी चौकशी लावण्याचे हौस असेल, तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झाले ? यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे. आत्तापर्यंत अफरातफरी गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याचे एसआयटी चौकशीचा काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे २८ ते ३० लोक गेले. एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याचे एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का ? असा सवाल केला. एसआयटी चौकशी लावण्याचा जे काही नाटक सरकारकडून सुरू आहे ,फडणवीस साहेबांनी कही पे निगाहे, कही पे निशाणा करू नये फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर ते थेट सभागृहात बोलावे. आडून-अडून राजेश टोपे ,पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे असे नावे न घेता थेट निशाणा साधावा. थेट बोलावे कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असे वाटते की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटे सारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत हे आमचे अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले

कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गॅंगवार किती टोकाला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटते येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे . मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत अशी टीका अंधारे यांनी केली.

Web Title: "If the party tells me, I will contest the election against the candidate.", Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.