लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 01:48 PM2021-07-11T13:48:56+5:302021-07-11T13:49:04+5:30
डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
कल्याण- केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या आधारे कोरोना लसीचे डोस राज्याला आणि विविध महापालिकाना पुरविले जात आहेत. मात्र लसीचे डोस पुरेशे येत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट कशी रोखायची असा सवाल कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केंद्राकडून राज्य आणि महापालिकांना जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध व्हावे अशी मागणी खासदार शिंदे यांना केली आहे.
डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. लोकसंख्येचे आधारे लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जातात. कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या जास्त आहे. राज्यातील मुंबई एमएमआर रिजन हे सगळयात मोठी नागरी वसाहत आहे. त्याची लोकसंख्या पाहता एमएमआर रिजनसह राज्याला जास्तीत जास्त लसीचे डोस केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजेत.
जानेवारी महिन्यापासून लसीकरण देशभरात सुरु झाले. सुरुवातीला लसीचे डोस केंद्र सरकारकडून पुरविले जात होते. मात्र आत्ता मध्यंतरीच्या काळात लसीकरण सातत्याने बंद ठेवण्याची वेळ विविध महापालिकांवर येत आहे. त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेतील लसीकरण पाच ते सात दिवस बंद होते. तज्ञांच्या मते देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. तिस:या लाटेची शक्यता असताना लसीचे डोस पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. तर तिसरी लाट रोखणार कशी असा प्रश्न आहे याकडे खासदार शिंदे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. केंद्राने मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करुन दिल्यास जास्तीत लोकांचे लसीकरण होऊ शकते. हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने गेतला पाहिजे असे शिंदे यांनी सांगितले.