जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली

By अनिकेत घमंडी | Published: March 26, 2023 12:33 PM2023-03-26T12:33:00+5:302023-03-26T12:33:37+5:30

पंकजा वल्ली यांना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान, अदिती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने २७ वर्षे सेवकार्य

improvement in women situation after repeal of 370 35a in jammu and kashmir said pankaja valli | जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली

जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली

googlenewsNext

डोंबिवली: दहशतवाद जेव्हा टोकाला पोहोचला होता त्याचे सर्व समाजावर परिणाम झालेच परंतु त्यातही महिला आणि लहान मुले हे सर्वात जास्त पीडित आहेत, असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मिरमध्ये ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे असे मत किलांबी पंकजा वल्ली यांनी व्यक्त केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार शनिवारी त्यांना (पंकजा दीदी) यांना मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्या २७ वर्षे जम्मू काश्मीर मध्ये अदिती सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत. स्मृतिचिन्ह, मानपत्र व ५१ हजार रुपये असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते. या निमित्ताने पंकजा यांची मुलाखत हम संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी घेतली. २७ वर्षांचे जम्मू मधील त्यांचे अनुभव पंकजा दीदींनी प्रेक्षकांसमोर मांडले. व्यवसायाभिमुख शिक्षण, आरोग्य व महिला सबलीकरण यातील अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन या निमित्ताने पंकजा उपस्थितांना केले.

सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार प्रदान समारंभामध्ये लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी जयोस्तुते हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीर्वाद बोंद्रे यांनी केले. पंकजा यांचा विस्तृत परिचय अर्चना जोशी यांनी करून दिला तर कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी आभार प्रदर्शन केले. रिद्धी करकरे हिने कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. पुरस्कार प्रदान समारंभाच्या पूर्वी डोंबिवलीतील विविध रोटरी क्लबचे सदस्य, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी पंकजा यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला व त्यांना अदिती सेवा प्रतिष्ठानच्या कार्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: improvement in women situation after repeal of 370 35a in jammu and kashmir said pankaja valli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.