महावितरणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; कर्मचाऱ्यांसह कुटुंबियही सहभागी
By अनिकेत घमंडी | Published: June 7, 2024 04:33 PM2024-06-07T16:33:00+5:302024-06-07T16:34:00+5:30
डोंबिवली महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा झाला.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा झाला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
महावितरणच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन तसेच कल्याण स्थापत्य मंडलांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या संयुक्त जंयती महोत्सवाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवताना लेखक जगदिश ओहोळ यांचे व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले. तर त्यानंतर ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या व्यावसायिक नाटकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे निखळ मनोरंजन करताना त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, संदिप पाटील, विजय मोरे, दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, हविषा जगताप, उपसंचालक सुमीत कुमार, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लिपिक गणराज वाळींबे यांनी केले.