दुचाकीच्या फाटलेल्या सीटमुळे महिलेच्या दागिन्यांचा लागला सुगावा

By मुरलीधर भवार | Published: June 24, 2024 05:47 PM2024-06-24T17:47:36+5:302024-06-24T17:48:26+5:30

मानपाडा पोलिसांच्या चांगल्या तपासामुळे महिलेची ही दागिने आणि रोकड परत मिळाली आहे.

in dombivali the torn seat of the bike gave clues to the woman jewellery | दुचाकीच्या फाटलेल्या सीटमुळे महिलेच्या दागिन्यांचा लागला सुगावा

दुचाकीच्या फाटलेल्या सीटमुळे महिलेच्या दागिन्यांचा लागला सुगावा

मुरलीधर भवार, डोंबिवली : कारमधून उतरताना महिलेची बॅग खाली पडली. बागेत महागडे दागिने आणि रोकड होती. मानपाडा पोलिसांच्या चांगल्या तपासामुळे महिलेची ही दागिने आणि रोकड परत मिळाली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत बॅग जवळ एक झोमॅटो आणि दुसरा स्विगी बॉय दिसतोय. परंतू बॅग कोणी घेतली आहे याचा अंदाज येत नव्हता.बॅग घेऊन जाणाऱ्या एका माणसाला शोधण्याकरीता एका हायप्रोफाईल इमारतीमधील २४ सीसीटीव्ही चेक करावे लागले. स्विगी बॉय ज्या दुचाकीवर होता. त्या दुचाकीची सीट फाटलेली होती या फाटलेल्या सीटमुळेच महिलेचे दागिने मिळाले आहेत.

डोंबिवली पूर्वेतील अनंतम रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या कविता परब या त्यांच्या कुटुंबियांसोबत काही दिवसापूर्वी जेवण करण्यासाठी डोंबिवलीतील एका नामांकित हॉटेलमध्ये गेल्या होत्या. लक्षात आले की, कारमधून उतरताना त्यांचे दागिने आणि रोकडची बॅग रस्त्यात पडली. त्या परत आल्या. बॅगेत रोकड आणि दागिन्यांसह अतिमहत्वाचे कागदपत्रे होती. त्वरीत कविता परब यांनी याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली.

मापपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरिक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाच्या तपासाकरीता पथक नेमले. पोलीस कामाला लागले. पोलिस कर्मचारी मंदार यादव आणि अन्य पोलिसांनी ज्या ठिकाणी बॅग पडली होती. तो भाग सीसीटीव्हीत दिसत नाही. एक झोमॅटो बॉय आणि दुसरा स्विगी बॉय त्याठिकाणी येता जाताना दिसत आहे. या दोघांपाकी एकाने बॅग घेतली आहे. हे निश्चित झाले. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला तर स्विगी बॉयने ही बॅग घेतली असल्याचे उघड झाले. त्याला शोधण्याकरीता पोलीस तो कुठून आला होता. तो कोणाची ऑर्डर घेऊन आला होता. याकरीता अनंतम रिजेन्सी या इमारत संकुलात २४ इमारतीत फिरले. अखेर २४ व्या इमारतीत हा सुगावा लागला की, स्विगी  बॉय कुठे आला होता. त्याचा नंबर काय आहे. त्या नंबरहून त्या व्यक्तीला फोन केला. स्विगी  बॉय स्वप्नील कोलार याने कबूली दिली की ती बॅग माझ्याकडेच आहे. त्या बॅगला मी हात देखली लावला नाही. मला माहिती नव्हते. ही बॅग कोणाची आहे. ती कुठे जमा करायची असे सांगून त्याने ही बॅग पोलिसांना दिली. कविता परब यांना पोलिसांनी ही बॅग परत केली आहे. कविता यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

Web Title: in dombivali the torn seat of the bike gave clues to the woman jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.