महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा

By अनिकेत घमंडी | Published: June 24, 2024 05:25 PM2024-06-24T17:25:44+5:302024-06-24T17:27:52+5:30

महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदी त्यांची नियुक्ती.

in dombivli prevent leakage electricity in welfare circle of mahavitaran says new chief engineer chandramani mishra | महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा

महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा

अनिकेत घमंडी,डोंबिवली: कल्याण परिमंडलामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच वीज गळती कमी करून महावितरणच्या महसूल वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी सांगितले. महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी पदोन्नतीवर सोमवारी कार्यभार स्वीकारला.

त्याआधीचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची मुंबईतील बांद्रा येथील मुख्य कार्यालयात समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी मिश्रा रुजू झाले. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सन २०१९ ते २०२२ या कालावधीत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत राज्यात शेतकऱ्यासांठी एक लाख सौर कृषिपंप कार्यान्वित झाले. तसेच सौर ऊर्जा निर्मितीचे एक हजार २३० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलर रुफ टॉप आणि ईव्ही चार्जिन्ग स्टेशन उभारणीच्या विशेष कामगिरीबाबत महावितरणला विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. 

Web Title: in dombivli prevent leakage electricity in welfare circle of mahavitaran says new chief engineer chandramani mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.