कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी

By मुरलीधर भवार | Published: September 12, 2022 03:37 PM2022-09-12T15:37:52+5:302022-09-12T15:38:55+5:30

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मिडियावर जोरदार खडाजंगी सुरू आहे.

In Kalyan a poster campaign by the Congress regarding the son of the Union minister of the BJP | कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी

कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी

Next

कल्याण -

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मिडियावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. मात्र हा वाद आता सोशल मीडियावरून थेट रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असून त्यांच्या मुलासंदर्भात बॅनर लावत कल्याण जिल्हा काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. मात्र या भारत जोडो यात्रेएवढीच किंवा त्यापेक्षा अधिक राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टची चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. या विषयावरून सोशल मीडियावर तर काँग्रेस आणि भाजपमध्ये अक्षरशः रणकंदन माजले आहे. परंतू सोशल मीडियावर सुरू असणारे हे काँग्रेस आणि भाजपचे ड्रेसिंग वॉर आता थेट रस्त्यावर येऊन पोहोचले आहे.

सध्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मुलाचा संदर्भ देत कल्याण जिल्हा काँग्रेस पश्चिमचे ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर यांनी बॅनर लावत भाजपला लक्ष्य केले आहे. या बॅनरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या मुलाने महागडे टी शर्ट घातल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच ' आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून ' असा शब्द प्रयोग करत विमल ठक्कर यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्ट वरून भाजपाने टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाने हे बॅनर लावले असल्याचे जिल्हाध्यक्ष सचीन पाेटे यांनी सांगितले.

Web Title: In Kalyan a poster campaign by the Congress regarding the son of the Union minister of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण