महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण

By मुरलीधर भवार | Published: December 20, 2023 07:23 PM2023-12-20T19:23:27+5:302023-12-20T19:24:28+5:30

कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

in kalyan ex bjp corporator brutally beat up women employees of mahavitaran by her husband | महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण

मुरलीधर भवार, कल्याण- दोन महिन्यांचे ६ हजार रुपये वीज बिल थकल्याने वीज मीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याना भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे आणि तिचा पती कैलास पावशे यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व काटे मानवली परिसरात घडली . याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे . पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका पावशे आणि तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात भाजपच्या माजी नगरसेविका पावशे त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराचे ६ हजार रुपये वीज बिलाची थकबाकी होती . दोन महिन्यांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिल भरण्यासाठी त्यांना सांगितले होते . मात्र थकीत बिलाचा भरणा न केल्याने आज दुपारच्या सुमारास महावितरणचे पथक पावशे यांच्या घरी वीज मीटर कट करण्यासाठी गेले . मीटर कट करण्याची कारवाई करताच त्या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे या पोहोचल्या. त्यांनी या महावितरणच्या पथकातील महिला कर्मचारी पल्लवी टोळे ,प्रियस्वी पडवळ यांना शिविगाळ करत बेदम मारहाण केली . पावशे यांचे पती कैलास हे देखील त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत या महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी केली . त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतले .

घडलेला घटनेबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस हेल्पलाइनवर फोन करून माहिती दिली. कोळसेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले . याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .या तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरसेविका पावशेसह तिचे पती कैलास यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: in kalyan ex bjp corporator brutally beat up women employees of mahavitaran by her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.