बालकांच्या हाताच्या ठशांनी रेखाटले चित्र; कल्याणमध्ये अनोखा उपक्रम
By सचिन सागरे | Published: June 15, 2024 04:38 PM2024-06-15T16:38:26+5:302024-06-15T16:39:57+5:30
पश्चिमेकडील कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.
सचिन सागरे, कल्याण : बालवर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या छोट्या छोट्या बालकांच्या हाताचे ठसे घेत झाडाचे चित्र रेखाटत शाळेचा पहिला दिवस साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पश्चिमेकडील कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.
पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली साबळे तसेच संस्थेच्या चिटणीस आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व शिक्षकांनी शाळेतील वर्गांची सजावट केली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. मिशन संस्थेच्या अम्माजी तसेच शालेय समितीचे सदस्य किशोर आल्हाट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.