कल्याण पश्चिमेत उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याने उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या; जाब विचारताच अधिकारी गेला पळून

By मुरलीधर भवार | Published: November 16, 2024 05:57 PM2024-11-16T17:57:12+5:302024-11-16T17:58:30+5:30

बॅनर फाडणाऱ्यांच्या विराेधात कारवाईची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहे त्याच्या जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता  पळ काढला.

In Kalyan Paschim candidate Rakesh Mutha's banner was torn down and the candidate stayed on the road; As soon as he asked for an answer, the officer ran away | कल्याण पश्चिमेत उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याने उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या; जाब विचारताच अधिकारी गेला पळून

कल्याण पश्चिमेत उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याने उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या; जाब विचारताच अधिकारी गेला पळून

कल्याण : विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी आत्ता अंतिम टप्प्यात शिगेला पोहचली आहे. कल्याण पश्चिम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे महापालिका अधिकारी अधिक जाणून बुजून त्यांच्याच बॅनर काढताय असा गंभीर आरोप करीत   मुथा यांनी रस्त्यावर याच्या निषेधार्थ  मुथा यांनी दोन तास ठिय्या दिला. या प्रकरणाचा जाब त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी काही एक जबाब न देता त्याने पळ काढला. 

कल्याण पश्चिम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार मुथा यांनी त्याच्या प्रचारार्थ मतदार संघात बॅनर लावले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून त्यांचे बॅनर त्यांच्या विरोधकांकडून फाडले जात आहे. या प्रकरणी मुथा यांनी तक्रार केली आहे. दुसरीकडे त्यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून काढला जात आहे. केडीएमसी प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात 
नाहीत. आज पुन्हा मोहने परिसरात मुथा यांच्या प्रचाराचा बॅनर काढण्यात आले. ही घटना कळताच मुथा यांनी माेहने परिसरात धाव घेतली. त्यांनी त्याठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलन केले.

बॅनर फाडणाऱ्यांच्या विराेधात कारवाईची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहे त्याच्या जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता  पळ काढला. या विषयी मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुथा यांनी सांगितले की, बॅनर फाडून कोणालाही निवडणूका जिंकता येत नाहीत. बॅनर फाडण्याचे काम इर्षेपोटी केले जात आहे. विराेधकांना पराभव दिसून लागल्याने त्यांच्याकडून हे कृ्त्य केले जात आहे एकीकडे बॅनर फाडले जात आहे तर दुसरीकडे महापालिका अधिकारी दबावत काम करीत आहे जाणून-बुजून माझा बॅनर काढला जात आहे. २३ तारखेनंतर याठिकाणी मी पण आहे आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी आहे. तेव्हा बघू काय करायचे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुथा यांनी आवाहन केले आहे की, नागरीकांनी विचार करुनच मतदान करावे.

Web Title: In Kalyan Paschim candidate Rakesh Mutha's banner was torn down and the candidate stayed on the road; As soon as he asked for an answer, the officer ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.