कल्याण आरटीओ कार्यालयात लायसन रिन्यूसाठी वरिष्ठ लिपिक मागतात जादाचे ५०० रुपये?
By अनिकेत घमंडी | Published: April 3, 2023 04:42 PM2023-04-03T16:42:09+5:302023-04-03T16:42:57+5:30
भाजपची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार, आरटीओ अधिकारी विनोद साळवी करणार चौकशी
डोंबिवली: डोंबिवली रिक्षा संघटनेच्यावतीने रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीमार्फत कायदेशीर प्रक्रिया करून लायसन रिन्यू असेल बॅच असेल अशी अनेक कामे आपल्या कार्यालयात नियमाप्रमाणे फी भरून सादर केली जातात, मात्र तरीही विशिष्ट व्यक्तींच्या कामाला विलंब केला जातो,कारण आम्ही शासकीय फी व्यतिरिक्त पैसे (जीफॉर्म) देत नाही, त्या कामाचे कल्याण आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदावरील एक महिला अधिकारी ५०० रुपये मागतात, असा आरोप भाजपच्या वाहतूक सेलचे जिल्हाअध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केला आहे. त्यासंदर्भात माळेकर यांनी सोमवारी कल्याण आरटीओ कार्यालयात निवेदन दिले आहे.
ते म्हणाले की, त्या ठिकाणी त्याच कामासंदर्भात इतरही दलाला मार्फत आलेली कामे पैशाची देवाणघेवाण करून वरिष्ठ लिपिक जलदतेने काम करतात,फक्त भाजप संघटनेच्या रिक्षा चालकांनाच त्यांनी लक्ष्य केले असून त्यांची कामे करण्यास ते अधिकारी टाळा टाळ करत असल्याचे।माळेकर यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात माळेकर यांनी प्रभारी आरटीओ विनोद साळवी यांनी बऱ्याच वेळा भाजपा संघटनेच्या रिक्षा चालकांच्या कामाविषयी फोनवरून तर कधी भेटून त्यांच्याशी बोलणे केले होते. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी समजली पाहिजे जे दलाल त्यांना पैसे(जी फॉर्म) देतात त्याची कामे त्वरित केली जातात असा अन्याय का होतो असा सवाल माळेकर यांनी केला.
ते म्हणाले की, आरटीओ अधिकार्यांना माहीत नसेल प्रत्येक कर्मचारी यांनी पैसे (जी फॉर्म )जमा करण्यासाठी खाजगी माणसे नेमलेली आहेत, जर त्यांना हवे असेल तर व्हिडिओ सहित पुरावे दिले जातील असा दावा माळेकर यांनी केला आहे. अखेर माळेकर म्हणाले की, या खाबूगिरीच्या वृत्तीवर तातडीने चौकशी करून असे प्रकार होत असल्यास ते तातडीने बंद व्हावेत आणि शासकीय फी नुसार काम व्हावी जेणेकरून सामान्यांना दिलासा मिळेल अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, म्हणून पत्राद्वारे कळवत आहोत असेही ते म्हणाले.
आरटीओ अधिकाऱ्यांनी सबधितांना वेळीच योग्य ती समज देऊन योग्य ती कारवाई करावी,अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करून वरिष्ठ पातळीवर न्याय मागवा लागेल, पत्राची दखल घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून कारभार सुरळीत, पारदर्शक व्हावा असेही ते म्हणाले.
माझ्यापर्यंत टपाल पोहोचलेले नसून अशी कोणाची तक्रार असेल तर त्याची सखोल चौकशी करून योग्य ती सुधारणा केली जाईल. सगळ्या कर्मचार्यांसह अधिकाऱ्यांची मिटींग लावली आहे. विनोद साळवी,
प्रभारी आरटीओ अधिकारी, कल्याण