ग्रामीण भागात आनंदाची शिधा सर्वसामान्यांच्या दारी

By मुरलीधर भवार | Published: October 22, 2022 01:21 PM2022-10-22T13:21:53+5:302022-10-22T13:22:23+5:30

मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत भोपर गावात शुभारंभ

in rural areas the ration of happiness is at the door of the common man | ग्रामीण भागात आनंदाची शिधा सर्वसामान्यांच्या दारी

ग्रामीण भागात आनंदाची शिधा सर्वसामान्यांच्या दारी

Next

कल्याण-दिवाळी निमित्त राज्य शासनाने गोरगरीब जनतेसाठी सुरु केली आहे. शुक्रवारी मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण मतदार संघातील १०८ दुकानांमधून ३६,४८८ लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

दिवाळीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. घराघरात फराळ केला जातोय. बाजारपेठा ही सजल्या आहेत.यामध्ये राज्य सरकारने गोर-गरिबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १०० रुपयात रेशन कीट देणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला आहे. भोपर गावात या योजनेचा शुभारंभ झाल्याने वेळेत सर्व सामन्यांना "आनंदाची शिधा" अल्प दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. सर्व सामान्यांना देण्यात येणाऱ्या आनंदाची शिधा या मधील सर्व साहित्याची आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. व अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून या बाबतची माहिती घेतली. यावेळी शिधावाटप अधिकारी महेश कुसमुडे,सहाय्यक शिधावाटप अधिकारी रुचिका कोळवणकर,संदीप चौधरी,शिधा वाटप निरीक्षक विद्या प्रधान,प्रेम काळे,संतोष संसारे,शेख राणिक, माधवी यांजरेकर यांसह माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी, काटई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, अमर माळी,प्रसाद माळी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

लाभार्थ्यांना योग्य नियोजन करून शासनाने जाहीर केलेला शिधा वेळेत पोहचेल याच योग्य नियोजन करा. तसेच केंद्र चालकांनी व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी,अशी सूचना आमदार पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली.आमदार व कल्याण ग्रामीण शिधा वितरण समितीचे अध्यक्ष या नात्याने धान्य वाटपावर पूर्ण लक्ष ठेवून आनंदची शिधा हा उपक्रम संपल्या नंतर संपूर्ण मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: in rural areas the ration of happiness is at the door of the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.