स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कचरामुक्त तारांकित शहर मध्ये १ स्टार मानांकन प्राप्त
By मुरलीधर भवार | Published: January 11, 2024 09:18 PM2024-01-11T21:18:08+5:302024-01-11T21:18:17+5:30
कल्याण : गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कचरामुक्त तारांकित शहर ...
कल्याण: गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कचरामुक्त तारांकित शहर मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेस १ स्टार* *मानांकन प्राप्त झाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक संख्येच्या शहरांमध्ये कल्याण डोंबिवली शहरास, राष्ट्रीय स्तरावर १०२ वा क्रमांक व राज्य स्तरावर २४ वा क्रमांक मिळाला होता. मागील सर्वेक्षणामध्ये मध्ये कचरामुक्त तारांकित शहर मध्ये कोणतेही मानांकन कल्याण डोंबिवली शहरास मिळाले नाही.
यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये , तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व सध्या कार्यरत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या मागर्दशनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन सुलभ व अधिक पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात आले. कचरामुक्त तारांकित शहर मानांकन तयारी, घनकचरा व्यवस्थापन आणि शहर स्वच्छता यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला.
कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी यांचे परिश्रम आणि नागरिक व स्वयंसेवी संस्था यांचा सकारात्मक प्रतिसाद या सर्व कामगिरीची दखल घेत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंखेच्या शहरांमध्ये कल्याण डोंबिवली शहराचा राष्ट्रीय स्तरावर ६७ वा क्रमांक व राज्य स्तरावर १६ वा* क्रमांक मिळाला आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथमच कचरामुक्त तारांकित शहर १ स्टार मानांकन कल्याण डोंबिवली शहराला मिळाले आहे.
महापालिकेला प्राप्त झालेल्या या मानांकनाबाबत महापालिकेस वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या एनजीओ, इतर सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबाबत महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आभार मानले आहेत.