ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका 

By मुरलीधर भवार | Published: November 16, 2023 07:43 PM2023-11-16T19:43:46+5:302023-11-16T19:44:03+5:30

खासदार शिंदे यांनी सांगितले की, त्यांना ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे टाकले आहे.

In the Gram Panchayat elections, the voters showed you your seat Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray without naming him |  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका 

 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका 

कल्याण - २०१९ मध्ये स्वतःसाठी मतदारांचा विश्वासघात केला. त्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणूकित मतदारांनी तुमची जागा दाखवली अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. खासदार शिंदे यांनी सांगितले की, त्यांना ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे टाकले आहे. सातव्या नंबर म्हणजे शेवटून पहिला नंबर असल्याचा टोमणा मारला आहे. खासदार शिंदे यांच्या हस्ते खोणी गावातील शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले . यावेळी खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे याना लक्ष केले कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा ठाणे जिल्हा असेल आपल्याला निधीची कमतरता नाही.

 येणाऱ्या महापालिका ,ग्रामपंचायत ,लोकसभा विधानसभा, निवडणुका जिंकायची असेल तर संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल, घराघरात सरकारचे काम पोहोचवावे लागेल. जोमाने कामाला लागा, घरा घरात शिवसैनिक तयार झाला पाहिजे. शिवसेना पोहोचली पाहिजे ,असे काम करा . हेवेदावे सोडून संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्या असे आवाहन उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले .जनतेचा मुख्यमंत्र्यांवर असलेला विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या विश्वासावर शिक्कामोर्तब करण्याचे काम यंदाच्या ग्रामपंचायती च्या निवडणुकीतून झाले आहे. काही लोक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष चिन्हावर होत नाहीत असे म्हणाले पण जर जर आमच्या ठिकाणी ते असते तर आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या असे बोलले असते याकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: In the Gram Panchayat elections, the voters showed you your seat Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray without naming him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.