पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षात देशात अमृतकाळाची चाहूल अनुभवता आली...
By मुरलीधर भवार | Published: September 20, 2023 04:27 PM2023-09-20T16:27:58+5:302023-09-20T16:28:31+5:30
खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची व्यक्त केली प्रतिक्रिया
कल्याण- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ९ वर्षात देशाच्या अमृतकाळाची चाहूल अनुभवता आली असल्याची प्रतिक्रिया कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची व्यक्त केली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देशभरात आज सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना या शुभ मुहुर्तावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय संसदेच्या नव्या पर्वाचा आज प्रारंभ झाला. लोकशाहीचे मंदिर असलेल्या नव्या संसद भवनात आज सर्व सहकाऱ्यांसमवेत प्रवेश केला. संसदीय कामकाजाच्या गेल्या नऊ वर्षांच्या अनुभवाने समृद्ध होऊन आज नव्या संसद भवनात प्रवेश करताना, राष्ट्रभावनेने भारलेल्या संस्कारांची शिदोरीही आज सोबत आहे. गेल्या नऊ वर्षांतील वाटचालीने राष्ट्रसेवा आमि जनहिताची एक नवी दृष्टी मिळाली.
समाजहिताच्या वेगवेगळ्या प्रश्नांकडे पाहण्यासाठी आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी समविचारी नेत्यांचे भक्कम पाठबळ गरजेचे असते. संसदेत आणि केंद्र सरकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल विकास विचारांतून देशाला लागलेली अमृतकाळाची चाहूल या नऊ वर्षांत अनुभवता आली.
नव्या संसद भवनातील भावी वाटचालीसाठी हा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जनसेवा व राष्ट्रसेवेचे बळ आता गाठीशी आहे. त्याच प्रमाणिक भावनेने भविष्यात मतदारसंघाचा विकास आणि जनतेची अधिक सेवा करण्याचा निश्चय करत अमृत काळाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत असे खासदार शिंदे यांनी सांगितले.