ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना चटके; चार तास वीजपुरवठा खंडित
By अनिकेत घमंडी | Published: April 11, 2023 06:06 PM2023-04-11T18:06:32+5:302023-04-11T18:07:06+5:30
रस्ते खोदकामात पाल इन्कमर मुख्य वीजवाहिनी नादुरुस्त
डोंबिवली: महावितरणच्या पाल इनकमर येथून येणाऱ्या दोनीही मुख्य केबल वीजवाहिनी रस्ता खोदकाम करताना नादुरुस्त झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. त्यामुळे डोंबिवली, कल्याण शहरांना जो इतर ठिकाणाहून अधिकचा विद्युत पुरवठा होतो आहे त्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी ठिकठिकाणी वीज पुरवठा।खंडित करण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना महावितरण आणि रस्ते खोदकामामुळे उकाडा आणि उन्हाच्या चटक्यांना सामोरे जावे लागत आहे.
महावितरण अधिकाऱ्यांनी ही माहिती।दिली असून त्यांनी सांगितले की, या ठिकाणी एकूण सहा विभागानां विद्युत पुरवठा केला जातो. या घटनेमुळे एकदम सर्वांना पुरवठा देणे शक्य नाही, त्यामुळे आलटून पालटून एक किंवा दोन विभाग बंद ठेवून जास्तीत जास्त विभागाला कसा विद्युत पुरवठा देता येईल असा प्रयत्न महावितरण करत आहे. वाहिन्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले होते, त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुपार पर्यंत सर्व पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. वीज खंडित होण्याची समस्या मंगळवारी पहाटे सुरू झाली, नेतीवली ते लोकधारा विज पारेषण केंद्र या सुमारे अडीच किलो मिटरच्या भूमिगत विज वाहिणी मध्ये (केबल ) दोष निर्माण झाला असल्याने रात्री उशीरा कल्याण पूर्वेतील काही भागाचा विज पुरवठा खंडीत झाला होता. रात्रीच या घटनेची दखल घेत महावितरणने काही विभागात पर्यायी व्यवस्था करून विज पुरवठा सुरु केला होता. परंतु केबल मध्ये नक्की कोणत्या ठिकाणी दोष निर्माण झाला आहे ते शोधण्याचे काम चालु असुन दोषाचे ठिकाण सापडल्या नंतर दोष दुरुस्ती तत्परतेने करण्यात येवून संपूर्ण संपूर्ण विभागाचा विज पुरवठा सुरळीत करण्याचा।प्रयत्न।केला होता.