पहिल्याच पावसात श्री मलंगगडावर दरड कोसळली; लेकाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

By पंकज पाटील | Published: June 10, 2024 04:16 PM2024-06-10T16:16:42+5:302024-06-10T16:17:17+5:30

दोन जखमींवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू

In the very first rain, Sri Malanggad was hit by a crack; Death of father who went to save daughter's life | पहिल्याच पावसात श्री मलंगगडावर दरड कोसळली; लेकाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

पहिल्याच पावसात श्री मलंगगडावर दरड कोसळली; लेकाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

पंकज पाटील, अंबरनाथ: पाहिल्याच पावसात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर सोमवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाच दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जखमींवर उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. मात्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात धोका निर्माण होत असतो. धोका असताना देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास नागरिक येत असतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून एका घरावर दरड कोसळली आहे. दरड कोसळताना मुलाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा  मृत्यू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी वन विभागाच्या वतीने परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली होती. मात्र सुरू झालेली कारवाई लवकरच आटोपती वन विभागाने घेतल्याने यंदा देखील दरड कोसळली आहे.

गुलाम सय्यद( ३५)  असे मृत व्यक्तीच नाव आहे. तर त्याच्या दीड वर्षाचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर मुलाच जीव  वाचवायला गेले असताना मुलाचा जीव वाचला मात्र वडील गुलाम सय्यद यांना जीव गमवावा लागला आहे. तर जखमी नाभिया आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: In the very first rain, Sri Malanggad was hit by a crack; Death of father who went to save daughter's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.