लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरुवात, १४ ऑगस्ट रोजी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 03:11 PM2021-08-12T15:11:29+5:302021-08-12T15:11:42+5:30
Kalyan News: लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४ ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे
कल्याण - लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४ ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे अशी माहिती पु. ल. कट्टय़ातर्फे देण्यात आली.
पु. ल. कट्टय़ाचे पदाधिका:यांनी ही माहिती दिली. या वेळी कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक गिरीष लटके, ज्येष्ठ नाटय़ अभिनेते आणि कवी सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी होणा:या कार्यक्रमास वामन कर्डक यांच्या गावचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्यासह जे. जे. आर्ट स्कूलचे गणोश तरतरे, कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटना निमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात अरुण म्हात्रे, प्रशांत वैद्य, रमेश आव्हाड, किरण येले, प्रशांत मोरे, संदेश ढगे, वृषाली विनायक आणि आकाश पवार आदी सहभागी होणार आहेत.
पु. ल. कट्टा ही संस्था कल्याणमध्ये दोन दशके साहित्यिक आणि सामाजिक कार्य करीत आहे. पु. ल. देशपांडे आणि वामन कर्डक हे समकालीन होते. कर्डक यांनी त्यांची लेखनी सर्व दूर पसरविली. कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम केले जाणार आहे. लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी कवी किरण येले हे काम पाहणार आहे. तर कार्याध्यक्ष पदी कवी प्रा. प्रशांत मोरे काम पाहणार आहेत. जनसहभाग केंद्र स्थानी ठेवून वर्षभर कार्यक्रम केले जाणार आहेत. त्यात उद्घाटन, जलसा, विविध स्पर्धा, शॉर्ट फिल्म, वामनदादा कर्डक गीत गायन स्पर्धा, चित्रकला, कॅलीग्राफी, एकांकीका, आठवणी संकल्प,परिसंवाद, कवयित्री संमेलन, प्रज्ञावंताच्या सहवासात दहा कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्याचे स्वरुप ऑफ आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारचे आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुनच हे कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्यात राज्यातील १० जिल्हे सहभागी होणार आहेत. कर्डक यांच्या गावातून डिसेंबर २०२१ मध्ये दिंडी काढली जाईल. ही दिंडी, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई ठाणो येथून काढली जाईल. या दिंडीची सांगता जानेवारी २०२२ कल्याणमध्ये सांगता होईल.