दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण!

By अनिकेत घमंडी | Published: September 6, 2023 12:50 PM2023-09-06T12:50:02+5:302023-09-06T12:51:05+5:30

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पूर्वेकडे (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर सुरू करण्यात आले होते.

Inauguration of another automatic escalator in the west at Diva railway station! | दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण!

दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण!

googlenewsNext

डोंबिवली : दिवा स्टेशनच्या पश्चिमेला मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटरवर खाली जा ये करण्यासाठीची सुविधा बुधवारी सुरू झाली. ती सुविधा थेट पादचारी पुलाशी जोडली आहे आणि प्रवाशांच्या वापरासाठी सुरू केली आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पूर्वेकडे (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर सुरू करण्यात आले होते आणि सार्वजनिक वापरासाठी उघडण्यात आले होते. प्रवाशांना लेव्हल क्रॉसिंग गेट रोडच्या बाजूने प्लॅटफॉर्मवर प्रवेश प्रतिबंधित व्हावा आणि प्रवाशांना एस्केलेटर आणि पायऱ्यांद्वारे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास प्रोत्साहित करता यावे याकरिता दिवा स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या मुंबई दिशेकडील टोकांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. 

पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूचे एस्केलेटर सुरू करणे आणि लेवल क्रॉसिंग गेटजवळ मुंबईच्या टोकाला प्लॅटफॉर्मचे बॅरिकेडिंग केल्याने गेल्या काही दिवसांत एस्केलेटर आणि पायऱ्यांचा वापर वाढला असून ट्रॅकचे ट्रेसपासिंग खूप कमी झाले असल्याचा दावा रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर प्रवासी सुविधांमध्ये हळूहळू वाढ आणि सुधारणा करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. 

दिवा येथे ट्रॅक ट्रेसपासिंग कमी करण्यासाठी आणि पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूच्या एस्केलेटरच्या वाढत्या वापरासाठी प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेने आभार व्यक्त।केले. दिवा लेवल क्रॉसिंग गेटवर गाड्यांची अडवणूक सुधारण्यास मदत होत आहे कारण रस्त्यावरील वाहनांसाठी लेवल क्रॉसिंग गेट उघडण्याचा वेळ कमी झाले आहे, आणि ट्रेसपासिंग कमी झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे. 

Web Title: Inauguration of another automatic escalator in the west at Diva railway station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.