दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण

By अनिकेत घमंडी | Published: August 16, 2023 04:52 PM2023-08-16T16:52:12+5:302023-08-16T16:52:41+5:30

दिवा रेल्वे स्थानकात तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याच बुधवारी शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Inauguration of automatic escalator at Diva station | दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण

दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण

googlenewsNext

डोंबिवली - दिवा रेल्वे स्थानकात तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याच बुधवारी शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. खासदार डॉ श्रीकांत शिंदे प्रयत्नाने व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनूसार ही सुविधा करण्यात आली. त्यावेळी माजी नगरसेवक शैलेश पाटील, उपशहर प्रमुख व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, भालचंद्र भगत, निलेश पाटील सर्व शाखाप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिवा स्थानकाला भेट दिली व पाहणी केली.

प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरील सरकत्या जिन्याचं काम लवकरच सुरू करण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच नवीन पुलावर नवीन तिकीट घर, एटीव्हीएम यंत्राची सोय करावी अशी मागणी भगत यांनी केली. फलाट क्रमांक २ वर डोंबिवली दिशेला गाडी आणि फलाट यामधील अंतर जास्त असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले, त्यानुसार आवश्यक ती उपाययोजना करावी असे सांगण्यात आले.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट ३/४ वरील मधल्या पादचारी पुलाला जोडणाऱ्या स्वयंचलित जिन्याचे काम जलदतेने व्हावे अशी मागणी प्रवाशांनी केली. काम रेंगाळले असून कामाचा कालावधी काय होता, आणखी किती काळावधो लागणार आहे याबाबतचे स्पष्टीकरण कंत्राटदाराने जाहीर करावे असेही प्रवासी म्हणाले.

Web Title: Inauguration of automatic escalator at Diva station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे