सरकत्या जिन्याचं लोकार्पण आणि दिवा रेल्वे फाटक क्रॉसिंग मुक्त झाला

By अनिकेत घमंडी | Published: August 17, 2023 04:27 PM2023-08-17T16:27:53+5:302023-08-17T16:29:45+5:30

रेल्वे क्रॉसिंगमुले होणाऱ्या रेल्वे अपघाताला १०० टक्के आळा बसणार असल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

Inauguration of Escalator and Diva Rail Gate Crossing became free | सरकत्या जिन्याचं लोकार्पण आणि दिवा रेल्वे फाटक क्रॉसिंग मुक्त झाला

सरकत्या जिन्याचं लोकार्पण आणि दिवा रेल्वे फाटक क्रॉसिंग मुक्त झाला

googlenewsNext

डोंबिवली:  दिवा रेल्वे स्थानक पूर्वेला तयार झालेला स्वयंचलित सरकत्या जिन्याचं बुधवारी लोकार्पण करून  प्रवाशांसाठी खुला झाल्याने प्रवाशांनी देखील ब्रिजवरून जाण्यास पसंती, प्राधान्य दिले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तेथील रेल्वे क्रॉसिंगमुले होणाऱ्या रेल्वे अपघाताला १०० टक्के आळा बसणार असल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी  लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस दिवा स्थानकाला दिलेल्या भेटीत फलाट क्रमांक १ व २ वरील मुंबई दिशेकडील शेवटच्या टोकाला फलाटावर चढण्या-उतरण्यासाठी  असलेले रॅम काढून त्या ठिकाणी रेलिंग बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्याठिकाणी रेलिंग बसवण्यात आली असून गुरुवारपासून दिवा रेल्वे फाटक संपूर्णतः रेल्वे प्रवासी क्रॉसिंगमुक्त असा दिसला. 

"दिवा रेल्वे स्थानकात वाढणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता दिवा रेल्वे फाटकावरील प्रवासी क्रॉसिंग ही कायमची बंद व्हावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटना गेले अनेक वर्ष रेल्वे प्रशासनाकडे करत होते. त्यासाठी संघटनेने देखील अनेक सूचना रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दिल्या होत्या. आता रेल्वे फाटकातून प्रवासी क्रॉसिंग 100% बंद झाल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक दिवेकरांचा जीव धोक्यात नसून त्याना संरक्षित प्रवास मिळून त्यांचा वेळही वाचणार आहेत. 

पावसाळा सुरू झाल्यापासून 50 पेक्षा जास्त दिवेकरांना येथे अपघाताला सामोरे जाऊन जीव गमावा लागला होता. रेल्वे प्रशासनांना घेतलेला निर्णय हा उत्तम असून त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे लाखो दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.

- अँड.आदेश भगत,अध्यक्ष दिवा रेल्वे  प्रवासी संघटना

Web Title: Inauguration of Escalator and Diva Rail Gate Crossing became free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे