ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण 

By अनिकेत घमंडी | Published: August 24, 2023 06:02 PM2023-08-24T18:02:29+5:302023-08-24T18:02:44+5:30

ठाकूर्ली येथील नागरिकांची बऱ्याच वर्षाची मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.

Inauguration of Escalator near Thakurli Railway Station | ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण 

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण 

googlenewsNext

डोंबिवली : ठाकूर्ली येथील नागरिकांची बऱ्याच वर्षाची मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली. त्यानूसार त्यांनी  रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करून ठाकुर्ली पूर्व विभागातील नागरिकांसाठी सरकत्या जिन्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. दोन दिवसांपूर्वी त्याचे काम झाले आणि तो अंतिम चाचणीनंतर प्रवाशांना खुला करण्यात आला.

त्या सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना शिंदे गटाने गुरुवारी डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी स्टेशन मास्तर आर पिंटो आर पी एफ विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच रेल्वे विभागाचे अनेक कर्मचारी आणि अनेक शिवसैनिक व ठाकूर्ली विभागातील नागरिक आनंदाने सहभागी झाले होते. त्यानिमित्ताने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो  अशा घोषणा देऊन ठाकुर्ली स्टेशनचा परिसर उपस्थितांनी दुमदुमून सोडला. ‌

Web Title: Inauguration of Escalator near Thakurli Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.