अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या कन्या सुरक्षा सर्कल'चे लोकार्पण
By अनिकेत घमंडी | Published: January 30, 2024 04:38 PM2024-01-30T16:38:55+5:302024-01-30T16:39:51+5:30
याच योजनेअंतर्गत कन्या सुरक्षा सर्कलची निर्मिती करण्यात आली.
डोंबिवली: अखिल भारतीय तेरापंथ श्वेतांबर जैन समाजाचे गुरू युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांच्या उपस्थितीत 'कन्या सुरक्षा सर्कल'चे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. मुलींच्या सुरक्षेकरिता डोंबिवलीच्या अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाने कन्या सुरक्षा योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबवन्यात आल्याचे चव्हाण म्हणाले. याच योजनेअंतर्गत कन्या सुरक्षा सर्कलची निर्मिती करण्यात आली.
आपल्या मुलींना धीट आणि साहसी बनवण्यासाठी हे स्मारक सदैव प्रेरणा देत राहील. या स्मारकावर लिहिलंय 'बेटी है तो सृष्टी है' आणि हे तितकंच खरं आहे. मुलींमुळेच आपल्या घरांची शोभा वाढते. मुली घरातील लक्ष्मी असतात, पण समाजात वावरताना त्यांना काली व्हायलाच पाहिजे. हे स्मारक स्त्रीशक्तीचं प्रतिनिधित्व करतं. आता संरक्षण खात्यातही महिला मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. या उद् घाटन प्रसंगी मुलींनीही संरक्षण खात्याचे युनिफॉर्म घातले होते. भविष्यात भारताचं नेतृत्व याच मुली करतील, असा विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले.