क्रिकेटवेड्या डोंबिवलीत 'नमो चषक २०२४' चा शुभारंभ
By अनिकेत घमंडी | Published: January 27, 2024 02:19 PM2024-01-27T14:19:09+5:302024-01-27T14:19:37+5:30
या स्पर्धेमध्ये डोंबिवलीतील एकूण १२० हुन अधिक संघांनी सहभाग घेतला आहे
डोंबिवली : हे शहर म्हणजे 'क्रिकेटची पंढरी'. इथल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचं भारी वेड आहे. आपल्याकडे क्रिकेट हा खेळ नुसता पाहिला जात नाही, तर त्याहूनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. इथल्या गल्लीगल्लीत आपल्याला क्रिकेट खेळणारे तरुण भेटतात. याच नगरीतून भविष्यातील निलेश कुलकर्णी, अजिंक्य रहाणे घडावेत यासाठी भाजप डोंबिवली शहर यांच्या वतीने 'नमो चषक २०२४'अंतर्गत अंडरआम क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या स्पर्धेचा शुभारंभ आज पार पडला.
या स्पर्धेमध्ये डोंबिवलीतील एकूण १२० हुन अधिक संघांनी सहभाग घेतला आहे. त्यावेळी भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, संदीप पुराणिक, भाजप डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष विशू पेडणेकर, पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, विधानसभा संयोजक संजीव बिडवाडकर, विधानसभा निवडणूक प्रमुख प्रज्ञेश प्रभूघाटे, सरचिटणीस मितेश पेणकर, प्रकाश पवार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.