डोंबिवलीतील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

By मुरलीधर भवार | Published: January 26, 2024 03:24 PM2024-01-26T15:24:06+5:302024-01-26T15:24:21+5:30

सद्या सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले असून एखादी अशी जागा असावी की त्यात आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरण मिळेल.

Inauguration of Oxygen Park in Dombivli | डोंबिवलीतील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

डोंबिवलीतील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर मध्ये वंदेमातरम् उद्यानाजवळ आणखी एक 'मनोहर वाटिका' नावाचे उद्यान विकसित करण्यात आले असून त्यामध्ये ऑक्सिजन पार्कची उभारणी करण्यात आली असून नागरिकांना येथे बसून काही खास झाडांतून ऑक्सिजन द्वारे निर्माण होणारा मोकळा श्वास घेता येईल. सद्या सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले असून एखादी अशी जागा असावी की त्यात आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरण मिळेल. ६० बाय १० आणि ९ फूट उंच अशा बंदिस्त नेट ग्रीन लावलेल्या जागेत हे ऑक्सिजन पार्क उभे करण्यात आलेले आहे. यामध्ये फायकस Ficus Benojamina, फोनिक्स पाम Foonix Palm, ड्रेसेना कोलोरामा रेड आणि ग्रीन Dracaena Red/Green, आरेका पाम Areca Palm, क्लोरोफायटमबाबी  Chlorophytum, अलोवेरा कोरफड Aloe Vera, सेन्सवेरिया Sensevieria Snake plant, राफीस पाम Rhaphis Palm, ड्रॅगन ट्री, तुळस इत्यादी ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली आहेत.

या ' मनोहर वाटिका ' उद्यानात ओपन जिम बनविण्यात आल्याने तेथे नागरिकांना विविध प्रकारचे व्यायाम करता येणार आहे. तसेच चालण्याच्या व्यायाम साठी जॉगिंग ट्रॅकची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच उद्यानात एक छोटी विहीर बांधण्यात आली असून त्यातील पाणी हे येथील झाडांना देण्यात येईल.

या उद्यानाचे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले आहे. मिलापनगर रेसी. वेलफेअर असोसिएशनचे दिवंगत माजी अध्यक्ष कै. मनोहर चोळकर यांच्या पत्नी श्रीमती संध्या मनोहर चोळकर यांच्या हस्ते सदर उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. कै. मनोहर चोळकर यांची कल्पना व इच्छा होती की, अशा प्रकारे उद्यान मिलापनगर मध्ये झाले पाहिजे. सदर उद्यान ग्लोब ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलोपर्सचे संचालक माधव सिंग यांच्या सहयोगाने बनविण्यात आले आहे. या उद्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे सचिव अरविंद टिकेकर यांनी केले आहे.

Web Title: Inauguration of Oxygen Park in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.