कल्याणमधील एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

By मुरलीधर भवार | Published: February 8, 2024 04:54 PM2024-02-08T16:54:56+5:302024-02-08T16:55:28+5:30

१३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Property Exhibition of MCHI in Kalyan by KDMC Commissioner | कल्याणमधील एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

कल्याणमधील एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण - क्रेडाई एमसीएचाआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणच्या फडके मैदानात आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, पदाधिकारी सुनिल चव्हाण, अरविंद वरक, रोहित दीक्षित, साकेत तिवारी, माजी अध्यक्ष रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एमसीएचआयचे अध्यक्ष छेडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त जाखड या नव्या असल्या तरी त्यांचे एमसीएचआयला चांगले सहकार्य मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त करीत या पुढेही असे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. आयुक्त जाखड यांनी सागितले की, महापालिका आर्थिक दृष्ट्या ज्याठिकाणी कमी पडते. त्याठिकाणी गरज भासल्यास एमसीएचआय या संघटनेने पुढाकार घेऊन महापालिकेच्या विकास कामांना साथ दिली पाहिजे असे आवाहन केले. या आवाहनाला एमसीएचआय संघटनेचा सकारात्मक प्रतिसाद असेल असे आश्वासन एमसीएचआयने दिले दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव भांबुरे यांनी केले.

या प्रदर्शनात ४० पेक्षा जास्त बिल्डर सहभागी झाले आहे. १५० गृह प्रकल्पांची माहिती घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. १६ लाखापासून ते १ कोटी पर्यंत किंमतीची घरे या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या प्रदर्शनास हिंदी सिनेमा अभिनेत्र शोमिता शेट्टी भेट देणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रदर्शनास भेट देणार आहेत. हे प्रदर्शन ११ फेब्रुवारीपर्यंत नागरीकांकरीता खुले राहणार आहे.

Web Title: Inauguration of Property Exhibition of MCHI in Kalyan by KDMC Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण