भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल
By मुरलीधर भवार | Published: January 24, 2023 07:18 PM2023-01-24T19:18:43+5:302023-01-24T19:18:49+5:30
त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत.
कल्याण- त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत. तर हात कुठे जोडणार ? असा सवाल केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्री पाटील आज कल्याणमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी उपराेक्त टिका काॅंग्रेसच्या भारत जाेडाे आंदाेलनावर केली. भारत जाेडाे आंदाेलनासह आत्ता नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या काॅंग्रेसच्या हात जाेडाे आंदाेलनाची पाटील यांनी खिल्ली उडविली.
सपाचे नेते स्वामीप्रसाद मौर्या यांनी रामचरित मानस तुळशीदासचे रामायण बॅन करा असे वादग्रस्त विधान केले होते यावर मंत्री पाटील यांनी त्यांच्या या विधानाला त्यांच्या पक्षाने देखील पाठिबा दिलेला नसून ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक रामचरित मानस भारतातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात भिनलेले आहे. रामायण टीव्हीवर लागताच रस्ते सुनसान व्हायचे. ५ हजार वर्षापूर्वीची पुराणातली देवाची परंपरा त्याद्वारे उभी केली आहे. आमच्या ह्रदयात राम वसलेले आहेत. त्यांच्या बद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या शिवसेना वंचितच्या आघाडीवर चार चाकाची वेगवान गाडी असे बालेले जात आहे. त्यावर मंत्री पाटील यांनी वंचितच्या नेत्यांनी अद्यापि आपले कॉंगेस आघाडीबरोबर बोलणे व्हायचे असल्याचे म्हटल्याची आठवण देत वंचित आघाडीबरोबर युती म्हणजे अजूनही दोनच चाके आहेत, ती तीन सुद्धा झालेली नाहीत. आघाडीचा याबाबतचा निर्णय झालेला नसताना घोषणा कशाला ? असा याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.