ग्रामीण भागातल्या स्टार्टअपसाठी नाविन्यपूर्ण योनेतून निधी द्यावा; डॉ. श्रीकांत शिंदेची आग्रही मागणी

By मुरलीधर भवार | Published: November 12, 2022 02:53 PM2022-11-12T14:53:06+5:302022-11-12T14:53:40+5:30

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणांना फायदा होईल, अशा स्टार्टअप शिबिरांचे आयोजन नाविन्यपूर्ण योजनेमध्ये करण्याची गरज असून त्यासाठी निधी देण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत केली आहे.

Innovative ways to fund startups in rural areas; Dr. Urgent demand of Srikant Shinde | ग्रामीण भागातल्या स्टार्टअपसाठी नाविन्यपूर्ण योनेतून निधी द्यावा; डॉ. श्रीकांत शिंदेची आग्रही मागणी

ग्रामीण भागातल्या स्टार्टअपसाठी नाविन्यपूर्ण योनेतून निधी द्यावा; डॉ. श्रीकांत शिंदेची आग्रही मागणी

googlenewsNext

कल्याण- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणांना फायदा होईल, अशा स्टार्टअप शिबिरांचे आयोजन नाविन्यपूर्ण योजनेमध्ये करण्याची गरज असून त्यासाठी निधी देण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनासारखे प्रकल्प महिला बचत गटांच्या माध्यमातून यशस्वीरित्या होऊ शकतात. सोबतच जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र नसून त्यासाठीही निधी देण्याची आग्रही मागणी डॉ. शिंदे यांनी केली. ठाण्याच्या नियोजन भवनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात घनकचऱ्याचा हा प्रश्न वाढतो आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातून एखादा स्टार्टअप यासाठी उपाय घेऊन आल्यास त्याचा फायदा होईल. स्टार्टअपला संधी दिल्याने अनेक प्रकल्प समोर येतील. तसेच त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. त्यामुळे नाविन्यपूर्ण योजनेतून अशा स्टार्टअप शिबिरांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी खासदार शिंदे यांनी केली.

काय मागण्या केल्या आहेत खासदार शिंदेंनी मलंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फ्युनीकुलर ट्रेन प्रकल्पातील उभारणी करण्यात आलेल्या रूळ आणि इतर साहित्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. हा प्रकल्प कंत्राटदाराच्या कारभारामुळे रखडला आहे. या प्रकल्पाचे आयआयटीकडून ऑडिट करण्यात यावे.अंबरनाथ तालुक्यात कुशिवली येथे प्रस्तावित असलेल्या धरणाच्या कामातील समस्या दूर करु कामाला गती देण्यात यावी जलजीवन मिशन याेजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. या योजनेसह अमृत टप्पा २ मधील कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्त करण्याची सूचना केली आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्या यावे. त्यासाठी नाविन्यपूर्ण याेजनेतून निधी द्यावा.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठी पाऊले उचलण्याचेही डॉ. शिंदे यांनी सुचवले. त्यावर बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.

ग्रामीण भागात वनक्षेत्र परिसरात बंधारे बांधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले. बांधण्यासाठीही लोकप्रतिनिधींना जागा सुचवण्याबाबत कळवावे. अंगणवाडी, शाळा आणि क्रीडा सुविधा उभारण्यासाठी निधीची तरतूद वाढवण्याची या विविध महत्वाच्या मागण्या खासदार शिंदे यांनी केल्या आहेत.

Web Title: Innovative ways to fund startups in rural areas; Dr. Urgent demand of Srikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.