जल जागृती सप्ताहानिमित्त केडीएमसी आयुक्तांचा पाहणी दौरा

By मुरलीधर भवार | Published: March 21, 2024 04:21 PM2024-03-21T16:21:46+5:302024-03-21T16:22:16+5:30

जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांच्यासह कल्याण डोंबिवली परिसराची चला जाणू या नदीला या उपक्रमांतर्गत काल पाहणी केली.

Inspection tour of KDMC Commissioner on the occasion of Water Awareness Week | जल जागृती सप्ताहानिमित्त केडीएमसी आयुक्तांचा पाहणी दौरा

जल जागृती सप्ताहानिमित्त केडीएमसी आयुक्तांचा पाहणी दौरा

कल्याण - जलजागृती सप्ताहानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांच्यासह कल्याण डोंबिवली परिसराची चला जाणू या नदीला या उपक्रमांतर्गत काल पाहणी केली.

या दौऱ्या दरम्यान आधारवाडी बायोमायनिंग प्रकल्प, गांधारे पुलानजीक नदीत सोडण्यात आलेल्या नाला, सांगळेवाडी नाला , मोहने पंपिंग स्टेशन येथील उल्हास नदीची पाहणी करण्यात आली. आयुक्त जाखड़ यांनी या ठिकाणांची सद्यस्थिती जाणून घेतली. जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांनी केलेल्या निरीक्षणावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. दोंदे यांनी नाल्याचे पाणी शुध्दीकरण प्रक्रिया करून नदीत सोडण्याकरिता आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत नदीसंवर्धनाच्या पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेस पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन त्यावर कृती आराखडा सादर करण्याबाबत आयुक्त जाखड़ यांनी निर्देश दिले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, जलनिःसारण, मलनिःस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ तसेच पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे , कार्यकारी अभियंता एमआयडीसी डोंबिवली, एसआरओ, एमपीसीबी कल्याण, मनुसृष्टी: पर्यावरण सल्लागार उपस्थित होते.
 

Web Title: Inspection tour of KDMC Commissioner on the occasion of Water Awareness Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण