पत्री पुलाचं नाव पत्री पूल कसं पडलं माहित्येय का?; जाणून घ्या रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 04:59 PM2021-01-25T16:59:16+5:302021-01-25T17:04:12+5:30

कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्री पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उद्घाटन

Interesting story behind naming of patri pool connection kalyan and dombivali | पत्री पुलाचं नाव पत्री पूल कसं पडलं माहित्येय का?; जाणून घ्या रंजक गोष्ट

पत्री पुलाचं नाव पत्री पूल कसं पडलं माहित्येय का?; जाणून घ्या रंजक गोष्ट

googlenewsNext

कल्याण: कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुलाचं उद्घाटन केलं. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पुलाच्या उद्घाटनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पत्र पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.

१९१४ मध्ये बांधण्यात आलेला पत्री पूल बांधण्यात आला. एक दशकापेक्षा अधिक काळ या पुलावरून वाहतूक सुरू होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये पत्री पूल पाडण्यात आला. वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागल्यानं नव्या पुलाचं बांधकाम सुरू झालं. अखेर दोन वर्षांनंतर या पुलाचं काम पूर्ण झालं. ग्लोबल स्टील हैद्राबादनं पत्री पूल बांधला आहे. 



पत्री पूलाला पत्री पूल हे नाव कसं पडलं, याची गोष्ट रंजक आहे. ब्रिटिश काळात पत्री पुलाची उभारणी करण्यात आली. जाड पत्रे, लोखंडी स्लीपरचा वापर करून पूल तयार करण्यात आल्यानं त्याला पत्री पूल नाव पडलं. २०१८ मध्ये पूल पाडला गेला. त्यावेळी पुलाच्या सांगाड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

कल्याणला डोंबिवलीसह भिवंडी, ठाणे, नवी मुंबईला जोडणाऱ्या पत्री पुलाचा वापर लाखो प्रवासी करतात. दोन वर्षांपूर्वी पूल पाडण्यात आल्यानं प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत होता. २०२० मध्येच पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पुलाचं बांधकाम जवळपास ३ महिने थांबलं होतं. त्यामुळे पुलाचं काम पूर्ण होण्यास २०२१ उजाडलं.
 

Web Title: Interesting story behind naming of patri pool connection kalyan and dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.