आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी गजाआड

By मुरलीधर भवार | Published: April 3, 2024 05:57 PM2024-04-03T17:57:27+5:302024-04-03T17:58:48+5:30

महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगळेवाडी राहणारे वाहन चालक हेमंत सांगळे यांच्या घरी २७ फेब्रुवारी रोजी घरफोडीची घटना घडली होती.

Interstate burglary gang was arrest | आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी गजाआड

आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी गजाआड

कल्याण-आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ््या टोळीला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या घरफोडी चोरट्यांची नावे अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग रुबीन डॅनियल अशी आहेत. या दोघांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेरही घरफोडी केल्या आहेत.

महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगळेवाडी राहणारे वाहन चालक हेमंत सांगळे यांच्या घरी २७ फेब्रुवारी रोजी घरफोडीची घटना घडली होती. घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील ४९ हजार रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने आणि ९ हजार रुपयांची रोकड चोरी केली होती. या गुन्हया प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश शाळवी यांनी या तपासासाठी पोलिसांचे पथक नेमले होते.

पोलिस पथकाने या प्रकरणाचा तपास करीत चोरट्यांना पकडण्याकरीता सापळा रचला होता. सगळ्यात प्रथम अविनाश शिंदे या चोरट्याला अंबरनात येथील दत्तकुटीर परिसरातून अटक केली आहे. त्या त्याठिकाणाहून पळून जाण्याच्या बेतात होतात. त्या आधीच पोलिसांनी सापळा रचून त्याच्यावर झडप घातली. त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याला या घरफोडीच्या कामात साथ देणारा साथीदार सॅमसंग रुबीन डॅनियल हा कल्याणच्या बेतूरकर पाड्यात राहत असल्याची माहिती मिळताच त्यालाही अटक केली. हे दोघेही राज्यातील कल्याण, जळगाव याठिकाणासह तेलंगणा राज्यातही घरफोडी करीत होते. त्यांनी १२ घरफाेडीचे गुन्हे केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. मुख्य आरापी सॅमसंग याच्या विरोधात ९ गुन्हे दाखल आहेत १२ गुन्ह्यातील ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील अविनाश हा चोरी केलेला माल सॅमसंग याच्याकडे देत होता. स’मसंग हा त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावीत असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Interstate burglary gang was arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.