सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक पोहोचले शिल्पकार जयदीप आपटेच्या घरी

By मुरलीधर भवार | Published: September 6, 2024 08:15 PM2024-09-06T20:15:34+5:302024-09-06T20:16:49+5:30

पोलिसांना आपटे याची आई,पत्नी आणि शेजारी यांनी तपास कामात सहकार्य केले आहे.

investigation team of sindhudurg police reached the house of sculptor jaydeep apte | सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक पोहोचले शिल्पकार जयदीप आपटेच्या घरी

सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक पोहोचले शिल्पकार जयदीप आपटेच्या घरी

मुरलीधर भवार-कल्याण: सिंधूदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला शिल्पकार जयदीप आपटे याची एकीकडे पोलिस कोठडीत सुरु आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्गपोलिस तपास पथक आज कल्याणमधील आपटे याच्या घरी पोहोचले. आपटे याच्या घरात तीन तासाच्या चौकशी नंतर त्याच्या शिल्पालयात दाखल झाले. पुतळा तयार करण्यासाठी काेणते साहित्य वापरले ? याचा तपास पोलिस करीत आहे. पोलिसांना आपटे याची आई,पत्नी आणि शेजारी यांनी तपास कामात सहकार्य केले आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक आज आपटेच्या घरी दुपारी साडे तीन वाजता दाखल झाले. या पथकाने साडे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्यांची आई, पत्नी आणि अन्य सदस्यांची चौकशी केली. या चाैकशी नंतर पोलिस पथकाने आपटे यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेले त्याचे शिल्पालय गाठले. आपटे याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले होते हे तपास पथकाने पाहिले. छत्रपती महाराजांचा पुतळा त्याच्या शिल्पालयात तयार केला असल्याने शिल्पालयालयातून काही काय पुरावे लागल्यास ते पुरावे सिंधुदुर्ग न्यायालयात सादर केले जाऊ शकतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी पडल्याची घटना घडली. या घटनेच्या दिवसापासून या पूतळ्याचा शिल्पकार आपटे हा पसार झाला होता. त्याने त्या दिवशी त्याच्या कुटुंबियांना तो घटनास्थळी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याच्या कल्याण येथील घराला कुलुप होते. आपटे यांच्या अटकेची मागणी विरोधी पक्षांसह शिवप्रेमीकडून करण्यात होती. दोन दिवसापूर्वी कल्याणच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या पथकाने आपटे हा कल्याणच्या घरी येत असताना त्याला अटक केली. आपटे याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आल्यावर त्याला त्याठिकाणी न्यायालयात हजर केले गेले. त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: investigation team of sindhudurg police reached the house of sculptor jaydeep apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.