ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित

By अनिकेत घमंडी | Published: May 30, 2024 04:10 PM2024-05-30T16:10:46+5:302024-05-30T16:11:50+5:30

विविध विषयांवरील जनजागृतीचे फलक वर्षभर विद्यानिकेतन शाळेकडून लावले जातात. ही सहनशीलता नाही तर भ्याडपणा आहे.

It is cowardice not tolerance says Vivek Pandit | ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित

ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित

डोंबिवली:  सुसंस्कृत, उच्चशिक्षितांंचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशिक डोंबिवलीकरांनी खड्डे, अरूंद रस्ते, सततची वाहन कोंडी, दर दोन वर्षांनी होणारे कंंपन्यांचे स्फोट, त्यात जाणारे हकनाक जीव आणि अनेक समस्यांवर वेळीच आवाज उठविला नाहीतर एक भ्याड नागरिकांंचे शहर म्हणून डोंबिवली शहरावर शिक्का बसेल, असा जनजागृती करणारा संंदेश विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी त्यांच्या शाळेच्या बसवर लावले आहेत. त्यांनी समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीकरांना आपल्या शहरातील नागरी आणि इतर समस्यांवर परखड, उघडपणे बोलायला शिका, यासाठी पुढे या, असा संदेश आपल्या शालेय बसच्या पाठीमागे लावलेल्या फलकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारचे विविध विषयांवरील जनजागृतीचे फलक वर्षभर विद्यानिकेतन शाळेकडून लावले जातात. ही सहनशीलता नाही तर भ्याडपणा आहे.

खराब, रखडलेले रस्ते, बेछुट वाहनचालक, सार्वत्रिक अस्वच्छता, अपुरा, अनियमित पाणी, वीज पुरवठा, शहरात पालिका प्रशासन आहे की नाही अशा काळोख्यात उभी राहत असलेली बेसुमार बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांनी व्यापलेले शहरातील रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, चौक, पालिकेकडून इमारत बांधकाम परवानग्या देताना प्रीमिअम भरणा केला यो गोंडस नावाखाली इमारतींच्या तळाचे वाहनतळ रद्द करून तेथे विकासकांना सदनिका बांधण्यास देण्यात येत असलेली परवानगी, अशाप्रकारे लोकांना आणि वाहनांना टांगून ठेवण्याची ‘टेंगळे’ वृत्ती, मृत्युगोलाप्रमाणे प्रवाशांनी भरभरून जाणाऱ्या लोकल्स, दर दोन वर्षांनी होणारे कंपन्यांचे सफोट, या आणि अशा अनेक विषयांवर कधीतरी उघडपणे बोलण्यास, आपल्या समस्या मांडण्यासाठी पुढे येणार की नाही. आपल्या शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला कधी जाब विचारणार की नाही, एमआयडीसी आणि निवासी भागाला संरक्षित करणारा बफर झोन कोणत्या राजकारण्याने खाल्ला. या स्फोटामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी या बफर झोन खाणाऱ्यांची नाही का. त्यांना काय शिक्षा होणार, या विषयांवर सुशिक्षित डोंबिवलीकर आता काही बोलले नाहीत तर एक भ्याड नागरिकांचे शहर म्हणून आपल्यावर शहरावर शिक्का बसेल. तेव्हा वेळीच जागृत व्हा, असे आवाहन या फलकाव्दारे करण्यात आले आहे.
 

Web Title: It is cowardice not tolerance says Vivek Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.