पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या दीपक गायकवाडने हजारो लोकांची फसवणूक केल्याचे उघड
By मुरलीधर भवार | Published: December 9, 2023 07:07 PM2023-12-09T19:07:56+5:302023-12-09T19:08:59+5:30
गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस महिला आघाडीची मागणी.
मुरलीधर भवार, कल्याण :कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या निधी कंपनीचे मालक दीपक गायकवाड याच्यासह त्याच्या साथीदारांनी दीड हजार लोकांची सुमारे ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याकडे केली आहे.
दीपक गायकवाड याने त्याच्या साथीदारांसह कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निधी नावाची कंपनी चालू केली होती. या कंपनीत अनेकांनी गुंतवणूक केली होती. एक लाख रुपयांमागे १५ जहार रुपये दर महिन्याला असे १२ महिने परतावा देण्याचे सांगितले होते. सुरुवातीला अनेकांना असा प्रकारे परतावा देऊन गुंतणूकदारांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याने परतावा देण्याचे बंद केले. दीपक गायकवाडला पोलिसांनी त्याच्या पत्नी आणि मुलाच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याच्या विरोधात हजारो नागरीकांनी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी केली आहे.
ज्या नागरिकांनी पैसे गुंतवले आहेत. त्यांची कागदपत्रे जमा करुन घेतली जातील. पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.