बर्थ डे आहे शहेनशहाचा, जल्लोष साऱ्या गावाचा; बैलाचा वाढदिवस धूमधडाक्यात
By मुरलीधर भवार | Published: March 11, 2023 05:01 PM2023-03-11T17:01:19+5:302023-03-11T17:03:22+5:30
डोंबिवली मोठा गावात बैलाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा
डाेंबिवली-बैलाचे नाव शहेनशहा. बैलाच्या मालकाचे शहेनशहावर जिवापाड प्रेम. शहेशनहाचा वाढदिवस मालकाने धुमधडाक्यात साजरा केला. त्यासाठी आणला केक. केक कापला माेठ्या जल्लाेषात. त्यासाठी आर्केस्ट्रा आणि जंगी पार्टीचेही आयाेजन केले हाेते. त्यामुळे शहेनशहाचा वाढदिवस सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला असून शहेनशहाच्या बर्थ डेचा व्हिडीआे साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डाेंबिवली पश्चिमेतील माेठा गावात राहणारे किरण म्हात्रे यांचा शहेनशहा नावाचा बैल आहे. या बैलावर त्याचे जिवापाड प्रेम आहे. त्यांनी त्याचा वाढ दिवस धुमधडाक्यात साजरा केला. शहेनशहाला शुभेच्छा देण्यासाठी गावातील बरीच मंडळी एकत्रित आली हाेती. त्याच्या बर्थ डेचा केक कापून त्याला केक भरविला. त्याच्या बर्थ डेचा केप पार्टीत सहभागी झालेल्यांनी माेठ्या आवडीने खाल्ला. त्याच्यासाेबत माेबाईल सेल्फीही काढण्यात अनेकांची चढाआेढ लागली हाेते. हे सगळे सुरु असताना शहेनशहा मात्र एकदम शांतपणे या स्वागत सभारंभाला समाेरा गेला. त्याची मात्र मज्जाच झाली. शहेनशहाच्या बर्थ डे पार्टीचा व्हीडीआे साेशल मिडियावर व्हायरल झाल्याने शहेनशहाच्या बर्थ डेची चर्चा सगळीकडेच रंगली आहे.
आपल्याकडे बैल पाेळा साजरा करण्याची पद्धत आहे. बैल पाेळ्याला बैलाला सजविले जाते. त्याला गाेडधाेड खाऊ घालून त्याची पूजा केली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते. ताेच मान शहेनशलाहा त्याच्या वाढदिवसाला मिळाला. शहेनशहाचा कालच बैल पाेळा झाला. आपला देश कृषी प्रधान आहे. त्यात शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा महत्वाचा साथी बैल आहे. त्याला शेतकऱ्याकडून जास्त मान दिला जाताे. १२ महिने राबवणाऱ्या बैलला बैल पाेळ्याला मान मिळताे. शहेनशहाला तर त्याच्या वाढदिवशीही मिळाला हे एकूण शेतकरी वर्गाकडून याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.