'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:34 PM2021-08-05T19:34:28+5:302021-08-05T19:34:53+5:30

महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

'It is a matter of great pride for KDMC school children to build satellites', commissioner of munciple corporation | 'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट'

'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट'

googlenewsNext
ठळक मुद्दे19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती.

कल्याण - महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. सदर मुलांना आज प्रशस्तीपत्र देऊन गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले. मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. 

महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ,रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68, बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. 18,  मनपा शाळा क्र. 12, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले. 

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले होते. 19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुट, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुध्दता, हवेतील प्रदुषण, हवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल.

या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.
 

Web Title: 'It is a matter of great pride for KDMC school children to build satellites', commissioner of munciple corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.