द महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे बिनविरोध; सचिव पदी अनिल नावंदर
By अनिकेत घमंडी | Published: August 9, 2023 01:20 PM2023-08-09T13:20:26+5:302023-08-09T13:21:41+5:30
सर्वच्या सर्व पदाधिकारी बिनविरोध झाले आहेत. दादर येथील कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
डोंबिवली : द महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यांना सलग नवव्यांदा अध्यक्ष व सचिव होण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची माहिती संघटनेचे निलेश वाणी यांनी दिली. राज्यातील एक लाख केमिस्ट सदस्य असणाऱ्या संघटनेवर पंचवीसवर्षा पासून प्रतिनिधित्व करीत आहे. सर्वच्या सर्व पदाधिकारी बिनविरोध झाले आहेत. दादर येथील कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
डोंबिवली असोसिएशनचे वतीने दिलीप देशमुख, विलास शिरुडे, राजेश कोरपे, निलेश वाणी यांनी शुभेच्छा दिल्या. द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या २०२३ ते २६ या कालखंडाकरता निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. नामांकन पत्र घेण्याची मंगळवारी अखेरची मुदत होती. पाच जागा करता घेण्यात आलेल्या या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांकरिता एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. याची अधिकृत घोषणा राज्य संघटनेच्या आमसभेत २०ऑगस्ट रोजी नाशिक येथे होईल.
निवडणूक अधिकारी दिलीप कदम, नितीन देव, सुनिल छाजेड यांच्या कडे अर्ज दाखल करण्यात आले. राज्यातील विविध विभागातून अर्ज दाखल झाले. त्यात अध्यक्ष जगन्नाथ शिंदे ठाणे, उपाध्यक्ष मुकुंद दुबे चंद्रपूर, उपाध्यक्ष अरुण बरकसे बीड, सचीव अनील नावदंर बुलढाणा, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुष्टे रत्नागिरी, सहसचिव प्रसाद दानवे मुंबई, संघटन सचीव मदन पाटील कोल्हापूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्य केमिस्ट संघटनेची नासिक येथे रोजी होणाऱ्या आमसभेत अधिकृत घोषणा होणार आहे.