जागरुक नागरीक फाऊंडेशनची पोलिस ठाण्यात धाव; भेटीस मज्जाव केल्याने केडीएमसीच्या विरोधात तक्रार
By मुरलीधर भवार | Published: January 24, 2023 08:01 PM2023-01-24T20:01:31+5:302023-01-24T20:01:40+5:30
नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे.
कल्याण-नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे. आज फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी नागरीकांच्या भेटीच्या दरम्यान आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना महिला सुरक्षा रक्षकाकडून मज्जाव करण्यात आला. नागरीकांच्या हक्कावर गदा आणल्याच्या विरोधात फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर हे फाऊंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रमुख समस्यावर तोडगा काढण्यासाठी फाऊंडेशने यापूर्वी ८ दिवस आंदाेलन केले हाेते. या आंदाेलनापश्चात त्यावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन प्रशासनाकडून दिले गेले. त्याची मुदत १५ दिवस होती. ही मुदत उलटू देखील ठोस तोडगा काढला जात नसल्याने कालपासून महापालिका मुख्यालयाच्या प्रवेश द्वारावर धरणो दिले जात आहे. आज पुन्हा महिला पदाधिकारी चेतना रामचंद्र, मीना भिडे, मिना बेरी, गिता जोशी, रुपाली शिरकर आदी नागरीकांच्या भेटीच्या वेळेत प्रशासनाची भेट घेऊ इच्छीत होत्या. त्यांनी आयुक्तांच्या दालनाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी महिला सुरक्षा रक्षकाने या महिलांना मज्जाव केला.
त्यांना दुस:या मजल्यावरुन खाली तळ मजल्यावर जाण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनिल कर्पे यावेळी उपस्थीत होते. त्यांनीही नागरीकांच्या भेटीची वेळ ३ ते ५ वाजता ही वेळ तर सगळ्य़ांकरीता खुली असावी. त्याच वेळेत पदाधिकारी महिला भेटायला जात होत्या. त्यांच्या अधिकारावर गदा आणणे कितपत योग्य आहे. या सगळ्य़ा प्रकाराची गंभीर दखल घेत घाणेकर यांनी पदाधिका:यांसोबत बाजारपेठ पोलिस ठाणो गाठले असून महापालिका प्रशासनाच्या प्रकाराविरोधात रितसर तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एखाद्या प्रकरणात गैर काही घडले तर महापालिका गुन्हा दाखल करते. तसेच सरकारी कामात अडथला केल्याचे सांगून गुन्हे दाखल केले जातात. नागरीकांनी त्यांच्या हक्कासाठी आत्ता महापालिकेच्या विरोधात पाऊल उचलले आहे. यात काही गैर नाही असे घाणेकर यांनी स्पष्ट केले आहे.