सर्व विषयात ३५ गुण मिळवणारा भिवंडीतील ‘जय’

By सचिन सागरे | Published: May 28, 2024 04:41 PM2024-05-28T16:41:03+5:302024-05-28T16:42:10+5:30

कल्याण तालुक्यातील मोहने परिसरात असलेल्या पाटील बालमंदिर विद्यालयात जय शिक्षण घेत होता.

Jai from Bhiwandi who scored 35 marks in all subjects | सर्व विषयात ३५ गुण मिळवणारा भिवंडीतील ‘जय’

सर्व विषयात ३५ गुण मिळवणारा भिवंडीतील ‘जय’

कल्याण : दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात ३५ गुण मिळवणाऱ्या भिवंडीतील कोन गावात राहणाऱ्या जय किशोर मुकादम याला शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे.

कल्याण तालुक्यातील मोहने परिसरात असलेल्या पाटील बालमंदिर विद्यालयात जय शिक्षण घेत होता. त्याचे वडील पंचायत समितीमध्ये कामाला आहेत. दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्व विषयात ३५ गुण मिळतील असे मला वाटले नव्हते. पण, असे गुण मिळाल्याने माझे नातेवाईक तसेच गावातील सर्वांकडून कौतुक होत आहे.

पुढे वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा माझा विचार असून याबाबत घरातील वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर बांधकाम क्षेत्रात किंवा स्वतःचा व्यवसाय करायचा असल्याचे जयने सांगितले. दहावीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जय पास झाला याचा आम्हाला आनंद असल्याचे त्याचे वडील किशोर मुकादम यांनी सांगितले.

Web Title: Jai from Bhiwandi who scored 35 marks in all subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ssc examदहावी