सहकार क्षेत्रात जनकल्याण सहकारी बँक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणणार - नरेंद्र पवार
By अनिकेत घमंडी | Published: May 29, 2024 06:37 PM2024-05-29T18:37:48+5:302024-05-29T18:38:36+5:30
जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील नामांकित बँकांपैकी एक बँक आहे.
डोंबिवली: सहकार क्षेत्रामध्ये जनकल्याण सहकारी बँक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणू असा संकल्प माजी आमदार जनकल्याण सहकारी बँकेचे संचालक नरेंद्र पवार यांनी केला आहे. जनकल्याण सहकारी बँकेला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने बँकेच्या ठाणे पश्चिमेतील शाखेमध्ये झालेल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील नामांकित बँकांपैकी एक बँक आहे. गेल्या ५० वर्षांपासून या बँकेने आपल्या ग्राहकाभिमुख आणि तत्पर सेवेतून लोकांचा विश्वास जिंकला आहे. या बँकेने नुकतीच ५०वर्षांची आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत थाटात 51 व्या वर्षामध्ये पदार्पण केले. ५० व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयासह २६ शाखांमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाण्यातील मुख्य कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. त्यात उपस्थितांशी संवाद साधताना बँकेचे संचालक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जनकल्याण सहकारी बँकेला पुन्हा एकदा सहकार क्षेत्रात पहिल्या स्थानावर नेण्याचा संकल्प केला.
यावेळी राष्ट्रीय सवयंसेवक संघ प्रांत कार्यवाह व ठाणे शाखा माजी संचालक राजु पटवर्धन, ठाणे शाखा व्यवस्थापक भरत सांगोलकर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वैभव संघवी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक दाते सर, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा केंद्रे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश माजी सह संयोजिका उज्वला गलांदे, एज्युकेशन टुडे फाउंडेशन व आर्य गुरुकुल या संस्थेचे सचिव भरत मलिक सर, माजी डी.जी.एम कृष्णन सर, सचिन आळशी, भाजपा ठाणे शहर जिल्हा चिटणीस कैलास म्हात्रे, संजय पुजारी, विश्वास दामले, एजीएम मोहनीश रजक यांच्यासह माजी कर्मचारी सदस्य आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.