राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला ४ पदके
By मुरलीधर भवार | Published: November 23, 2023 05:41 PM2023-11-23T17:41:31+5:302023-11-23T17:41:55+5:30
अशी कामगिरी करणारी आस्था ही ठाणे जिल्ह्यातील पाहिली खेळाडू ठरली आहे.
कल्याण - स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विरार येते १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ३३ व्या राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या देवांश राणे याने २०० मीटर आणि १०० मीटरमध्ये १ सुवर्णपदक आणि १ रौप्यपदक पटकावले आहे.
आस्था प्रकाश नायकर हिने १५००० रिंक एलिमीनेशन रेस आणि १० हजार रोड पॉईंट टू पॉईंटमध्ये २ रौप्यपदके मिळवली आहेत. आस्था हिने १७ वर्षा खालील वयोगटात ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारी आस्था ही ठाणे जिल्ह्यातील पाहिली खेळाडू ठरली आहे.
आस्था ही लोक कल्याण पब्लिक या शाळेत इयत्ता ८ वीत शिकत आहे. तिला शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि आई-वडिलांचेही सहकार्य मिळत आहे. स्केटिंग असोसिएशन राज्य अध्यक्ष पुष्पेंद्र सिंग, अश्विन कुमार, पवन ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आस्था सराव करत आहे.