कल्याण : दुर्गाडी खाडीवरील लेनच्या लोकार्पणाआधीच श्रेयवादाची लढाई; भाजपने लावला बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:49 PM2021-05-30T22:49:43+5:302021-05-30T22:51:48+5:30

सोमवारी करण्यात येणार आहे दोन लेनंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं लोकार्पण.

Kalyan BJP put up a banner before the inauguration of the lane on Durgadi creek | कल्याण : दुर्गाडी खाडीवरील लेनच्या लोकार्पणाआधीच श्रेयवादाची लढाई; भाजपने लावला बॅनर

कल्याण : दुर्गाडी खाडीवरील लेनच्या लोकार्पणाआधीच श्रेयवादाची लढाई; भाजपने लावला बॅनर

Next
ठळक मुद्देसोमवारी करण्यात येणार आहे दोन लेनंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं लोकार्पण

कल्याण- दुर्गाडी खाडीवर उभारल्या जाणाऱ्या सहा पदरी पुलापैकी दोन लेनचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या लोकार्पणाच्या आधीच भाजपने पुलाच्या नजीक या पुलाचे कामासाठी भाजपने पाठपुरावा केल्याचा बॅनर लावला आहे. त्यामुळे हा बॅनर आता चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक वरुण पाटील यांनी कोन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बॅनर लावला आहे. खाडीवरील नव्या पुलाच्या दोन लेनचे काम भाजप खासदार कपिल पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहे. त्यामुळे कल्याण कोन दरम्यानचा प्रवास सुखकर होणार आहे असा मजकूर त्यावर लिहण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

दरम्यान यापूर्वी ठाणो-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीवरुनही शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली होती. त्याचीही कल्याण भिवंडी रस्त्याला अशीच बॅनरबाजी करण्यात आली होती.
 

Web Title: Kalyan BJP put up a banner before the inauguration of the lane on Durgadi creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.